सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
झरी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अडेगाव येथे 18 व 19 फ्रेबुवारी ला विविध कार्यक्रमाचे आयोजन ठरविले आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड तथा शिवजन्मोत्सव आयोजन समिती यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कार्यक्रमाचे उदघाटन दि.18 फेब्रुवारी ला सायं. 6 वाजता होणार आहे. या प्रसंगी उदघाटक म्हणून आमदार प्रतिभाताई धानोरकर, स्वागताध्यक्ष संजय खाडे पणन महासंघ मुंबई संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष नितेश ठाकरे शिवजन्मोत्सव आयोजन समिती, विशेष अतिथी अजय धोबे जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, तर सत्कारमूर्ती आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार वामनराव चटप यांना निमंत्रित करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार मनवर यांच्या सह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.
या प्रसंगी सायं.8 वाजता सप्त खंजेरी वादक पवनपाल महाराज यांच्या समाज प्रबोधन पर किर्तनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर दुसऱ्या दिवशी 19 फेब्रुवारीला सायं. 5 वाजता शोभायात्रेसह भव्य मिरवणुकीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.
समारोपीय कार्यक्रमाला 8 वाजता सुरुवात होणार असून, यावेळी महिला सक्ष्मीकारण व छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर तेजस्विनी गव्हाणे यांचे जाहीर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष केतन ठाकरे व अध्यक्ष म्हणून संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष आशिष झाडे, यांच्यासह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी शासकीय सेवेत निवड झालेल्या गुणवंताचा सत्कार आयोजकाकडून घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, शिवजन्मोत्सव आयोजन समिती तर्फे करण्यात आले.