शिवसेना तर्फे साखर वाटप, तर मनसे तर्फे पाचकुंडीय होम हवन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगांव : अयोध्या नगरी येथे राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त मारेगांव येथील हनुमान मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन आज (ता.22) ला शिवसेना व मनसेच्या वतीने करण्यात आले.
     
अयोध्या मधील राम मंदिर लोकार्पण सोहळा व श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्त मारेगांव येथे हनुमान मंदीरात शिवसेनेच्या वतीने भाविकांना 10 क्विंटल साखरेचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी मारेगांव तालुका शिवसेना नेते गजानन किन्हेकार, तालुका प्रमुख विशाल किन्हेकार, नगरसेविका सुनिता किन्हेकार, ता उपाध्यक्ष विजय मेश्राम, यांच्या सह शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच मनसेच्या वतीने हनुमान मंदिरात सकाळी पंचकुंडीय महायज्ञ् होम हवन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष रुपेश ढोके यांनी सपत्नीक तसेच नागरिकाद्वारे पंचकुंडीय महायज्ञ् हवन करण्यात आले. कार्यक्रमाला मनसेचे नेते राजु उंबरकर यांनी भेट देऊन श्रीराम प्राणप्रतिष्ठा निमित्य जनतेला शुभेच्छा दिल्या, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, शहरअध्यक्ष चांद बहादे, आकाश खामनकर यांचे सह मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वाटप करून करण्यात आली.