रज्जाक पठाण यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश संघटक सचिव पदी निवड

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या आदेशानुसार वणी शहरातील धडाकेबाज सामाजिक कार्यकर्ते रज्जाक खान हयात खान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक सचिव पदी निवड केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश संघटक सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली असून पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी पण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा ठाम विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त केला आहे.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. श्री. शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
रज्जाक भाई यांच्या निवडीबद्दल पक्षाचे जेष्ठ नेते श्री. अनिल देशमुख यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, त्यांच्या पक्ष प्रवेशाने आता पक्ष संघटन मजबूत होणार आहे. त्यांची प्रदेश संघटक सचिव पदी 6 नोव्हेंबर ला निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांच्यावर राजकीय वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अफझल फारूकी तथा यवतमाळ जिल्हा निरक्षक, यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल सिद्दीकी, वर्षांताई निकम जिल्हा अध्यक्ष यवतमाळ, युवा जिल्हा अध्यक्ष राहुल कानारकर, जेष्ठ नेते आबीद हुसेन, युवक जिल्हा उपाध्यक्ष मुबीन शेख, सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष विजय नागराळे, युवा शहर अध्यक्ष शादाब अहेमद आदीनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शुभेच्छा दिल्या.