सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : कानडा येथे पहिल्यांदाच या वर्षी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. यात मोठ्या उत्सहाने बाल गोपालांनी सहभागी होऊन तान्हा पोळा साजरा केला आहे. यावेळी गावातील बाल गोपालांनी पारंपरिक वेशभूषा करुण, आपापले नंदी बैल सजवून गावपुढाऱ्यांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी सारे एकत्र जमले. हा प्रथमच नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असल्याचे उपस्थितांनी जाहीर केला.
मारेगाव तालुक्यात तान्हा पोळा हा ठिकठिकाणी साजरा होत असताना कानडा येथेही या तान्हा पोळ्याचे प्रथमच यंदा आयोजन करण्यात आले. कानडा ग्रामस्थांकडून बाल गोपालांसाठी भजनाची साथ मिळाली. शांततापूर्ण वातावरणात या तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सामाजिक संदेश देत बाल गोपालांनी एक आगळा वेगळा तान्हा पोळा साजरा केला. या पोळ्याला गावातील जेष्ठ, तरुण नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले. कानडा येथे मोठ्या हौसेने समस्त ग्रामस्थांनी बाल गोपालांच्या उत्सहात आपला आनंद द्विगुणित करित प्रथम वर्ष तान्हा पोळा सण साजरा केला.