मारेगांव पोलीस स्टेशन हद्दीत लोखंडी अँगलची चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून यासंदर्भात मारेगाव पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादी रोहीत लक्ष्मणराव बोलेनवार (34) रा. सुयोग नगर पांढरकवडा यांनी दि. 20/07/2023 रोजी पो.स्टे. मारेगाव येथे तक्रार दिली. त्यात नमूद केलं की,दि.10/07/2023 रोजी लेबर यांचेकडुन मौजा भालेवाडी रोपवन क्षेत्रातील रोपाकरीता 900 लोंखडी पोलाचे तार कंपाउड करणेकरीता पोल गाडुन ठेवले होते.
मात्र 19 जुलै च्या रात्री 10.30 वा. फिर्यादी व लेबर हे भालेवाडी परीसरात पाहणी करण्याकरीता गेलो असता  भालेवाडी रोपवन क्षेत्रातील गाडुन ठेवलेले लोखंडी एम.एस. अॅगल पोल 50 अंदाजे 30,000/- रुपये किंमतीचे अज्ञात चोरांनी चोरुन नेले. अशी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे, मारेगांव येथे अप. क.424/ 23 कलम 379,34 भांदवी अन्वये गुन्हा नोंद करुण तपासात घेतला.

सदर गुन्हयातील फरार आरोपी व मुददेमाल शोधण्याकरीता तात्काळ पो.स्टे. चे पथक तयार करुन नमुद गुन्हयातील आरोपी हुसेन सदानंद आडे ( 24) रा. बोधाड व शाम गाताडे (29) रा. सालेभटटी यांना पाथरी शिवारातुन मुददेमालसह ताब्यात घेण्यात आले. नमुद आरोपी यांनी सदर गुन्हा कबुल करुन आरोपीतांनी एम. एस. अॅगल पोल 50 अंदाजे 30,000 रुपये किंमतीचे त्यांचेकडून हस्तगत करण्यात आला आहे.
सदर गुन्हयात पुन्हा कोणाचा सहभाग आहे का? याबाबत तपास करुन आरोपीस अटक करण्यात आली तसेच सदर गुन्हयातील आरोपी यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता. पो.स्टे. मारेगांव अप. क. 162/23 कलम 379 भांदवी मधील मुददेमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्या अनुषंगाने तपास सुरु आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. पवन बन्सोड पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. पुयुष जगताप अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा. श्री. गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पो.नि. श्री. आधारसिंग स्थागुशा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि, जर्नाधन खंडेराव ठाणेदार मारेगांव, पोहेकॉ. आनंद अलचेवार, नापोकॉ. अफजल पठाण नापोकॉ, अजय वाभीटकर नापोकॉ, रजनीकांत पाटील चासफो, प्रमोद जिडडेवार, पोकॉ. विकास खंडारे व चापोकॉ अतुल सरोदे हे करीत आहे.