या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी यांनी नवनिर्वाचित सरपंच यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की,गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला त्या सर्व मतदारांचे मी ऋणी आहे. माझ्या वर गावाच्या विकासासाठी जो विश्वास टाकला, त्या विश्वासाचे आपल्या सहकार्याने नक्कीच सोने करू तसेच संपूर्ण निवडणुकीच्या काळात म्हणजे निवडणूक जाहीरहोण्यापूर्वीपासून पाठराखण करणारे तसेच उमेदवारी प्रचार व मतदान अशा अनेक टप्प्यावर पाठीशी राहणाऱ्या आपणा सर्वांचे कृतज्ञ आभार...
निवडणुकीतील जय पराजय हा दुय्यम भाग आहे,पण तुमच्यासारख्या हितचिंतकांचा आशीर्वाद सदैव पाठीशी आहे. मनःपूर्वक आभार....!
-सौ सुषमा रुपेश ढोके
सरपंच कानडा ग्रामपंचायत, पंस मारेगाव