आता अवघ्या दिवसापासून उपविभागातीलच नव्हे तर जिल्हा बाहेरील वाचनीय बित्तं बातम्या घेऊन पदार्पण करीत आहे.
या पूर्वी विविधांगी रूपातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, प्रशासनातील भ्रष्टाचाराचा ओघ, व्यवस्थेचा नागडेपणा, कॉलगर्ल, संवेदना, आत्महत्येची धग, हृदयद्रावक,हृदयस्पर्शी, वेदनादायी वृत्तांकने वाचणीयच नाही तर वाचकांच्या मनात आमच्या लेखणीने भुरळ पाडले आणि विभागात आम्ही वृत्तांकणाच्या माध्यमातून नंबर एक वरचा आलेख कायम ठेवलाय. हाच रेसो कायम ठेवण्यासाठी आता नव्या रुपात आम्ही नवी दिशा घेऊन येत आहो 'विदर्भ टाईम्स' च्या रुपात !
वाचकातील अतूट प्रेम आमच्या शब्दरूपी भावनांचा आदर करीत पहिल्या क्रमांकावरील ठरलेले बातम्यांचे नेटवर्क ही आमच्या यशाची फलश्रुती ठरली.
आता आम्ही क्षणात अन शब्दांचा अतूट संगम साधून दर्जेदार आणि वाचनीय वृत्तांकणाचा परामर्श घेणार आहोत विदर्भ टाईम्स न्यूज नेटवर्क मधून..नव्याने आपल्या सेवेत सादर होणाऱ्या आपण विदर्भ टाईम्स ई-पेपर चे नक्कीच वाचनीय शिलेदार व जाहिरातदार व्हाल या माफक अपेक्षा..!
आपले स्नेहांकित
दिपक डोहणे (संपादक) कैलास ठेंगणे (सहसंपादक)
विदर्भ टाईम्स न्यूज नेटवर्क
मारेगाव (यवतमाळ)