सह्याद्री चौफेर | लखन लोंढे
महागांव : फुलसावंगी सर्कल येथील अंकुश बाबूलाल आडे यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या फुलसावंगी सर्कल उपतालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे. यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे, यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच समाजाच्या तळागाळातील सर्वच घटकांपर्यंत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे उद्दिष्ट असलेल्या आपण सक्रिय शिवसैनिक आहोत ही अभिनंदनीय बाब आहे. म्हणूनच आपण आजवर पक्षासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आपली फुलसावंगी सर्कल उपतालुका संघटक पदी नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे. दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडावी. त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा उपप्रमुख सुदाम खंदारे, युवा शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रमोद (शाखा) भरवाडे, माजी शिवसेना शहराध्यक्ष सतीश नरवाडे यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.