सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935
सावली : पोंभूर्णा येथे दिनांक 22/10/2022 ला सायंकाळी 4-30 च्या सुमारास खळबजनक घटना घडली असून श्री दीपक पेंदाम वय वर्ष 30 यांचा करंट लागुन जागिच मृत्यू झाला ते रा. खेडी त. सावली जी. चंद्रपूर हे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी छोटासा मुलगा व आई आहे कुटुंबातील करता सरता कुटुंबप्रमुख होते. दिवाळी पर्वावर लोकांच्या घरात. प्रकाश व्हावा यासाठी "लाईन दुरुस्त, करत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
दुसऱ्याच्या घरी प्रकाश करता करता स्वतःच्याच घरात अंधार करून गेले. ही खळबळजनक घटना पोंभूर्ण येथे घडली. परिसरात घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा नगरीतील जनसमुदाय घटनेच्याच दिशेने धाव घेतली. या घटनेची माहिती पोभुर्णा पोलीस स्टेशनला देण्यात आले, पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळ तात्काळ दाखल होऊन पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. असे वृत्त लीही पर्यंत सूत्राकडून कळले आहे.