सह्याद्री चौफेर | न्यूज
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. सरत्या श्रावणात अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा किंवा बैल पोळा.
या दिवशी बैलांना शेतकरी आंघोळ घालतात. त्यांना खूप सजवतात. घरात पुरणपोळी, वडे, शंकरपाळी, बोन्ड असे पदार्थ बनवले जातात. बैलांकडून या दिवशी कष्टाचे कोणतेही काम शेत करी करून घेत नाहीत. बैलांबरोबरच इतर जनावरांनाही सजवले जाते. सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते.
काही जण धान्यांची खिचडीही पुरणपोळीबरोबर जनावरांना देतात. या दिवशी सर्व जनावरे खूप आनंदात दिसतात. ज्यांच्याकडे बैल नाहीत, ते मातीच्या बैलांची पूजा करतात. फार पूर्वीपासून शेतीतील सर्व कष्टाची कामे बैल करत आहेत. बैलाविषयी अनेक कथा, कविता, चित्रपट, लेख ही प्रसिद्ध आहेत.
या बैलपोळा अर्थात पोळा सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाढते. ती आपण चिरंतन ठेवूया. शेतीला पूरक व्यवसाय पशूपालन आहे. आपण सर्वांनी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया. त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देवूया.
पोळा सणाच्या सर्व शेतकरी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!