पूर बुडीत क्षेत्रातील शेतमजूर व गरीब शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : एक हात मदतीचा या अनुषंगाने तालुक्यातील  पूरग्रस्तांना व शेतकऱ्यांना मा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वतीने एक मदत म्हणून धान्य किट वाटप करण्यात आली आहे.

तालुक्यातील वनोजा, शिवणी, गाडेगाव, गोरज व चनोडा  भागातील पूरग्रस्त क्षेत्रातील मा.खा.धानोरकर यांच्या वतीने गरीब शेतकरी व पूरग्रस्तांना कुटुंबाला मदत म्हणून धान्य किट वाटप दि 25 ऑगस्ट रोजी करण्यात आले.

यावेळी वसंतराव आसुटकर (मारेगाव कृ बा स उपसभापती), मारोती गौरकार (तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव अध्यक्ष), गणुजी थेरे, बंडू काटवले सरपंच शिवणी, सौ गीता धांडे, सरपंचा वनोजा, सुरेंद्र काकडे चनोडा प्रमोद ताजणे गोरज, बंडू पुनवटकर, गुलाब बरडे, उपसरपंच गाडगे वनोजा, प्रमोद खंडाळकर, यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला.

मा खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या वतीने एक हात मदतीचा म्हणून मारेगाव तालुक्यातील शिवणी, वनोजा, गोरज, गाडेगाव व चनोडा येथील पूर बुडीत शेत मजूर, गरीब शेतकऱ्यांना धान्य किट चे वाटप करण्यात आले. तसेच अन्य पूरग्रस्त गावातील नुकसान ग्रस्ताना मदत देण्यात येईल असे, तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव अध्यक्ष यांनी सह्याद्री चौफेर बोलतांना माहिती दिली.