बिरसा क्रांती दल हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी श्री बालाजी केशव जवादे यांची निवड


कुमार अमोल |  सह्याद्री चौफेर 

हिंगोली : बिरसा क्रांती दलाच्या झेंड्याखाली आदिवासी समाजातील ४५ जमातीतील परिवर्तनशील युवक जागरूक शिक्षित कर्मचारी यांना संघटीत करण्याचा निर्णय बिरसा क्रांती दलाने घेतला आहे.
समाजातील अशा घटकांना संघटीत करण्याची धारणा स्वावलंबना स्विकार ही सर्व श्रेष्ठ गोष्ट असते. समाज्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती, ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे. या संघटनेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्ष पदी श्री बालाजी जवादे यांची निवड आज दि.२५-०८-२०२२ रोजी बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दशरथ मडावी सर यांच्या आदेशानुसार 'Online' करण्यात आली.
यावेळी बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रंगराव काळे सर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री डी .बी.अंबुरे सर, महाराष्ट्र राज्य सचिव श्री चिंधू दादा आढळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय आढारी, हिंगोली युवा अध्यक्ष श्री सोपान धनवे, परभणी जिल्हा अध्यक्ष, श्री नागनाथ डाखोरे सर, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री रोहित दादा पावरा, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री संतोष भाऊ बोटे, अकोले तालुका अध्यक्ष श्री विजय मेंगाळ, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.