वराेराचे पटवारी विनाेद खाेब्रागडेंनी केले कास्तकारांना सातबारा वाटप

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२ ऑक्टो.) : आज शनिवार दि.२ ऑक्टाेबरला महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्र शासनाच्या एका उपक्रमा अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वराेरा तालुका अंतर्गत येणां-या वराेरा साजाचे पटवारी विनाेद खाेब्रागडे यांनी साजातील गावात कास्तकारांना घरपाेच सातबारा वाटप केले आहे.

नुकतीच त्यांची राजूरा उपविभातुन वराेरा उपविभागात बदली झाली आहे. सातबारा वाटपाला आपला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीशी बाेलतांना सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने आज घरपाेच सातबारा वाटपाचा कार्यक्रम पार पडत आहे.
   (7/12 वितरित करताना खोब्रागडे पटवारी)

वरोरा येथील प्रगतीशील शेतकरी खेमराजजी कुरेकार यांच्यासह अनेक कास्तकार बांधवाना विनाेद खाेब्रागडे यांनी आज माेफत सातबारा वितरीत केले आहे.