पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी किट चे वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (०१ ऑगस्ट) : तालुक्यातील पाटणबोरी येथे कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतमजूर व शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिर जगन राठोड, उपविभागीय कृषि अधिकारी, पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषि अधिकारी कार्यालय पांढरकवडा मार्फत सुरक्षित रासायनिक कीटकनाशक फवारणी जनजागृती अभियान अंतर्गत आयोजित करण्यात आले.

सदर शिबिरात डॉ.बिराजदार व डॉ.निखिल चव्हाण प्रा.आ.के. पाटणबोरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराकरिता पाटणबोरी, पिंपरी बोरी, वाऱ्हा, कवठा, सून्ना, घुबडी, वडवाट येथील फवारणी करणारे शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांना रासायनिक कीटक नाशकांची सुरक्षित हाताळणी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच कापूस व सोयाबीन पिकावरील कीड व रोगाबद्दल माहिती राकेश दासरवार तालुका कृषि अधिकारी पांढरकवडा यांनी केले.   सिंजेटा इंडिया लि. मार्फत उपस्थितांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता दिनेश चव्हाण मंडळ कृषि अधिकारी पाटणबोरी, कृषि सहाय्यक आर बी चव्हाण, अश्विनी बोके, राहुल सोयाम तसेच सुरज गड्डमवार तालुका गट तंत्रज्ञान व्यवस्थापक, शेखर पालावार यांनी विशेष परिश्रम घेतले.