मराठा सेवा संघाच्या वतीने माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांचा सत्कार



सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (०४ सप्टें.) : मराठा सेवा संघाच्या वतीने माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त पुसद येथे समाजातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती व गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

महागाव तालुक्यातील राजकीय,सहकार क्षेत्रात शेवटच्या क्षणाला अनपेक्षित बदल घडवुन आणणारे माजी जि.प.सदस्य साहेबराव पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवुन मराठा सेवा संघाच्या वतीने पुसद अर्बन बँकेचे कार्य सम्राट अध्यक्ष शरद मैंद यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष दिगंबर जगताप सर, अनिरुद्ध पाटील, डॉ.माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.