शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार यांनी घडवलेली मूर्ती "श्री गाडगे महाराज मिशन मुंबई कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट


सह्याद्री न्यूज नेटवर्क |
मुंबई, (१८ ऑगस्ट) : श्री गाडगेबाबा महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत असून, त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

प्रबोधनकार ठाकरे लिखित 'श्री गाडगेबाबा' जीवनचरित्राच्या संत गाडगे महाराज मिशनच्यावतीने प्रकाशित दहाव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री  ठाकरे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा ऍड. यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते- पाटील आदी उपस्थित होते. 

यावेळी प्रारंभी मिशनच्यावतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सुप्रसिद्ध शिल्पकार यशवंत एनगुर्तीवार मु. पो. पाटणबोरी जि. यवतमाळ यांनी घडवलेली संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.