आपल्या ताईला रक्षाबंधनानिमित्त दिली शिलाई मशीन भेट


सह्याद्री न्यूज | रवी वल्लमवार 
केळापूर, (२५ ऑगस्ट) : भावा बहिणींच्या प्रेमाचा पवित्र सण 'रक्षाबंधन' दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी ही साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी रक्षाबंधन विविध ठिकाणी विविध पद्धतीने सण साजरा होताना पहायला मिळत असतांना केळापूर येथील समिता मसराम हिने भोई समाजाचे सामाजिक कार्यकर्ते प्रदिप भनारकर यांना राखी बांधून राखी पौर्णिमेचा सण उत्सहात साजरा केला. भावा बहिणींच्या पवित्र सणाच्या निमित्ताने "दोन परिवार दोन समाज" एकत्र मिळून सण साजरा करण्यात आल्याचे यावेळी चित्र दिसून आले आहे. मानवता हाच धर्म हा संदेश समाजात रुजला जावा म्हणून रक्षाबंधन सणा निमित्ताने प्रदिप नागोराव भनारकर व रोशन मसराम या दोन परिवारांनी एकत्र येऊन आपल्या लाडक्या ताई ला चक्क! नवीन शिलाई मशीन भेट दिली.

यावेळी प्रदिपभाऊ भनारकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, दैनंदिन जीवनात वावरतांना आत्मनिर्भर होण्यासाठी भगिनींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतेय, आपला स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आमची ताई पहिले स्वबळावर आपला रोजगार करून भविष्यात आपली उपजिविका चालवता यावी म्हणून  शिलाई मशीन भेट देण्यात आली.

ही प्रेरणादायी संकल्पना डॉ. निलेश परचाके, बापू पारशिवे यांनी नागपूर येथील अरुणा पुरोहित यांच्या विचारातून हा उपक्रम राबवण्यात आला.