कपाशी पिकांवरील गुलाबी बोन्ड अळी चे एकात्मिक कीड व्यवस्थापन मोहीम अंतर्गत खांदला येथे मास ट्रॅपिंग कार्यक्रम संपन्न


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (११ ऑगस्ट) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका अधिकारी कार्यालय, वणी यांचे वतीने उपविभागीय कृषी अधिकारी, पांढरकवडा श्री. जगन रोठोड व तालुका कृषी अधिकारी, वणी श्री. सुशांत माने यांचे मार्गदर्शनामध्ये मौजा खांदला येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक १० ऑगस्ट २०२१ रोज मंगलवार ला सकाळी ९:०० वाजता मार्गदर्शन सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थांनी खांदला येथील सरपंच हेमंतजी गोहोकार हे होते. व कार्यक्रमांस प्रमुख मार्गदर्शक श्री.पवन कावरे, मंडळ कृषी अधिकारी कायर हे उपस्थित होते.
खांदला येथील कृषी सहाय्यक श्री.मुकेश पत्रे यांनी आपल्या प्रस्ताविकात कृषि विभागाच्या विविध योजना कपाशी पिकांवरील गुलाबी बोन्ड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी व विषबाधा याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शन श्री. पवन कावरे यांनी कपाशी पिकांवरील गुलाबी बोन्ड अळीचे एकात्मिक नियंत्रणाबाबत तसेच तूर व सोयाबीन  पिकांवरील कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्री. डी डोमेश्वर बरडे कृषी सहाय्यक, नांदेपेरा यांनी कीटकनाशके खरेदी करताना घ्यावयाची काळजी व फवारणी करताना घ्यावयाची काळजी मार्गदर्शन केले.या प्रसंगी उपस्थित शेत मजूर यांना श्री हेमंतजी गौरकार, सरपंच खांदला यांचे हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात पाच शेतकऱ्यांना संकरीत फवारणी किटचे वाटप करण्यात आले. तसेच खांदला येथील ५० शेतकरी बांधवाना कामगंध सापळे व लुर्सचे वाटप करण्यात आले.
प्रत्यक्ष पिकाची पाहणी करून कामगंध सापळे लावण्या बाबत प्रात्यक्षिक शेतात करून दाखवण्यात आले. तसेच वाटप करण्यात आलेले कामगंध सापळे कापूस पिकात कापूस पिकाच्या कमीत कमी एक फूट उंचीवर लावण्याचे आवाहन शेतकरी बांधवाना करण्यात आले.
आभार प्रदर्शन श्री. डोमेश्वर बरडे कृषी सहाय्यक नांदेपेरा यांनी मानले. सदर खरीप हंगाम मार्गदर्शन सभेत गावातील शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.