सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
चंद्रपूर, (ता.१९) : मा.आमदार श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री व मा.श्री.हंसराज भय्या अहीर माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे नेतृत्वात तसेच मा.श्री.देवराव भाऊ भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा. मा.श्री.नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा व मा.श्री.ब्रिजभूषण पाजारे जि.प.सदस्य यांचे मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय योग दिवस, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्मृतीदिन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या 'मन की बात' या सर्व कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तालुका चंद्रपूर (ग्रामीण) मधील ताडाली, पडोली व नकोडा, मार्डा या जि.प.क्षेत्रातील व खालील प्रमाणे तारखे व वेळेनुसार सोशल डिस्टन्स ठेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्या त्या कार्यक्रमाची दिनांक वेळ स्थळानुसार कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी..
• दिनांक.२१ जून २०२१ आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणे.
• ताडाली, पडोली जि.प क्षेत्राच्या वतीने लोकसेवा मंगल कार्यालय पडोली येथील सकाळी ९.०० वाजता योगा कार्यक्रम.
• नकोडा,मार्डा जि.प. क्षेत्राच्या वतीने राम मंदिर नकोडा येथील सकाळी ९.०० वाजता योगा कार्यक्रम.
• दिनांक.२३ जून २०२१ ला डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांचा ताडाली,पाडोली व नकोडा,मार्डा या जि.प क्षेत्रातील प्रत्येक गावात स्मृतिदिन साजरा.
• दिनांक.२७ जून २०२१ला 'पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या' कार्यक्रमाचे ताडाली, पडोली व नकोडा, मार्डा या जि.प क्षेत्रातील प्रत्येक गावातील चौकात कार्यक्रमाचे प्रसारण.
अशा प्रकारे वरील प्रमाणे कार्यक्रम होत असून, प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यानी कार्यक्रम साजरे करण्याकरिता आपले मोलाचे योगदान द्यावे असे, आवाहन अनिल डोंगरे तालुका अध्यक्ष भा.ज.यू. मो चंद्रपूर (ग्रामीण),
विजय आगरे तालुका महामंत्री भाजपा यांनी केले आहे.