सह्याद्री न्यूज | ऋतुजा सोनवणे
बीड, (ता.४) : जिल्हा प्रशासनाने अपंग बांधवांचा कोविड-19 पासुन बचाव करण्यासाठी बीड समाजकल्याण सहाय्यक आयुक्त मा.डाॅ सचिनजी मडावी साहेब यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे बीड जिल्हयातील सर्व तालुके व सर्व नगरपरीषद, सर्व नगरपंचायत अंतर्गत कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हयातील सर्व केंद्रावरील अपंग बांधवांना विनाविलंब लस घेता यावी यासाठी सर्व तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुर्ण करण्यात आली आहे.
यामध्ये अपंग बांधव वयाने ४५ पासुन पुढील वय असेल अशा सर्व अपंग बांधवांना वैक्सीन लस घेता येणार असल्याची माहिती मिळाली.
आपल्या जवळील केंद्र असेल तेथे आपण आपल्या अपंग सहकार्याना घेऊन जायचे व लसीचा डोस घ्यायचा आहे.
यामध्ये अपंग,अंध,मुकबधीर,कर्णबधिर,अस्थिव्यंग किंवा इत्तर अपंग प्रकारातील असतील अशा सर्व दिव्यांग बांधवांना त्यांच्या नातेवाईक अथवा जवळच्या कार्यकर्त्यांनी त्या दिव्यांगाना जवळच्या लस केंद्रावर घेऊन जायचे आहे. व लस घेऊन त्यांना पुन्हा त्यांच्या घरी सुखरूप पोचावयाचे आहे. 'मानव सेवा हि इश्वर सेवा' समजुन त्यांना लस घेण्यासाठी सामाजिक बांधीलकी समजुन सहकार्य करावे.
जिल्हयातील आमचे तालुका आध्यक्ष,जिल्हा पदाधिकारी, तालुका पदधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांनी या दिव्यांगा प्रती सहकार्याची भावना मनात धरून अपंग बांधवांना वैक्सीन लस घेण्यासाठी उद्या ५ जुन २०२१ हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा आपल्या तालुक्यातील व परीसरातील कोणताही अपंग बांधव वैक्सिन लस घेण्यापासुन वंचित राहु नये. यासाठी आपण सर्वांनी मिळुन दिव्यांग बांधवांना सहकार्य करावे.
तसेच ग्रामिण भागातील अपंग बांधवांना तेथील सरपंच व त्याच्या सर्व सदस्यांनी अपंग बांधवांना लस केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी घ्यावी व लस घेतल्यानंतर त्यांना परत घरी सुखरूप पोहचवण्यासाठी आमच्या प्रहारच्या कार्यकर्त्यासह सहकार्य करावे. असे शाहु (आप्पा) डोळस जिल्हाउपाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित-प्रहार अपंग क्रांती आंदोलन जिल्हा बीड यांनी आवाहन केले.
(संपर्क साठी -9595255532/9423716136)
यावेळी काही अडचण आल्यास खालील नंबर वर फोन करून माहिती घ्यावी-मा. डाॅ.सचिनजी मडावी साहेब (सहाय्यक समाज कल्याण आयुक्त बीड) मो. (7720839155)
व
समाज कल्याण कार्यालय बीड मो. नं. (8668262795)
यावर संपर्क करावे.