बाबाराव किर्तीवार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथील सुपुत्र व यवतमाळ पोलिस अधीक्षक कार्यालय CRO ला कार्यरत असलेले बाबाराव किर्तीवार यांना गुरुवार दि. 24 ऑगस्ट रोजी पदोन्नती आदेश प्राप्त झाले असून त्यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector) पदी नेमणूक झाली. त्यांच्या पदोन्नती बद्दल सर्व स्तरावरून त्यांचं अभिनंदन होत आहे.
बाबाराव किर्तीवार यापूर्वी मारेगाव, वणी, शिरपूर, पांढरकवडा येथे कार्यरत होते. पुन्हा मारेगांव येथे आणि आता पोलिस अधीक्षक कार्यालय यवतमाळ CRO ला कार्यरत असतांना पोलीस उपनिरीक्षक पदी केली असून त्यांच्या विविध कामाची पोच पावती म्हणून त्यांची पोलीस उपनिरीक्षक (sub-inspector) पदी पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल वडगाव सह यवतमाळ परिसरात अभिनंदन होत आहे.

नरसाळा येथील युवकाने घेतला गळफास


विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 
 
मारेगाव : तालुक्यातील नरसाळा येथील एका युवकाने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 8 वाजता उघडीस आली.
गजानन नारायण मुसळे (३०) हे सकाळी शेतात गेले आणि निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आपली जीवन यात्रा संपविली. त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अस्पष्टता असून, आई-वडील, एक लहान भाऊ अशा बराच आप्त परिवार आहे.
            मृतक गजानन मुसळे (30) रा नरसाळा 

त्याचा मृतदेह मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून, पुढील तपास मारेगाव पोलिस करित आहे. 

जिबगाव वासीयांनी जपली अनेक वर्षांची परंपरा

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

सावली : वर्षभर शेतकरी वर्ग ज्यांच्या भरोशावर शेती करत असतो. त्या बैलांचा पोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सावली तालुक्यातील जिबगाव येथे अनेक वर्षांपासून ऐतिहासिक बैलांचा पोळा भरतो. मात्र कोरोना काळात दोन वर्षे या पोळाचे आयोजन नाममात्र करण्यात आले होते. 
    
पिढ्यान् पिढ्या हा बैलांचा पोळा येथील सर्वधर्म समभावातून जोपासला जात आहे. स्पर्धेच्या युगात ट्रॅक्टरचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पुर्वी पोळ्याच्या आदल्या दिवशी मोयबलला बैलांचे खांदे शेकत असतात. व दुसऱ्या दिवशी बैलांना रंगरंगोटी व सजावट केले जात असत. अशातच सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास जिबगाव येथे‌ . बैलांच्या जोड्यांच्या आंब्याच्या तोरणाखाली एकत्र येत असत. पोळ्यानिमित्त झळत्या म्हणत गावातील नागरिक हे बैलांच्या पाया व एकमेकांना टिका लावून नमस्कार घेत असतात. एकमेकांच्या घरी बैल जोडी नेवून भेट देत असतात.
पोळा पाहण्यासाठी गावातील महिला, पुरुष मोठ्या प्रमाणावर मिळेल त्याठिकाणी उपस्थित होते. या निमित्ताने जातीय सलोखा ठेवणे हि जिबगावची परंपरा आहे.

बोरी (खु) येथे उत्सहात पोळा सण साजरा

विवेक तोडासे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : तालुक्यातील बोरी खु येथे मोठ्या उत्सहात व शांततेत पोळा सण साजरा करण्यात आला.
या छोट्याश्या गावात पाच ते सहा बैलाची जोडी त्यांना सजवून गावाच्या मुख्य रस्त्यावर बैल पोळा भरवण्यात आला होता, यावेळी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अंकुश माफूर यांच्या उपस्थितीत हा पोळा सण पार पडला.


पोळा या सणानिमित्ताने गावातील महिला, पुरुष, युवक, युवती, बाल, वृद्ध सर्व उपस्थित होते. यावेळी सर्वांनी मोठ्या आनंदाने "एक मन गर्वरा पार्वती हर बोला हर हर महादेव" असा जयजयकार करित उत्सहाची प्रथम जोडीला मान देत

सांगता करण्यात आली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अंकुश माफूर यांनी तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेला पोळा व तान्हा पोळाच्या शुभेच्छा दिल्या. 

मा.ना.श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रयत्नाने पडोली फाटा चौकाला पाच कोटी एकवीस लाख रुपये निधी मंजूर

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : शब्दाला जगणारा अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या नेता दिला शब्द पूर्ण करणारे माननीय नामदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य व मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांनी पडोली वासी यांच्या मागणीनुसार तसेच श्री मनोज ठेंगणे माजी सैनिक यांनी काही दिवसांपूर्वी पडोली फाटा चौकात सिग्नल व स्ट्रीट लाईट या मागणी करिता उपोषण केले असता मा.ना.सुधीरभाऊ यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्त्याना येत्या काही दिवसात आपण आपली मागणी पूर्ण करू असा शब्द दिला
व श्री मनोज शिंगणे यांनी मा. ना.श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या शब्दावर विश्वास ठेवून नींबू शरबत पिऊन आपले उपोषण सोडले मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी रस्ते सुरक्षा उपाययोजना आयुक्त परिवहन अंतर्गत पाच कोटी एकवीस लाख रुपयाचा निधी मंजूर करून पडोली वासी व उपोषण कर्ते यांच्या मागणीला दिलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल मा.ना. श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे फटाके फोडून पेढे वाटून "सुधीरभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी. श्री रामपाल सिंग भाजपा ज्येष्ठ नेते श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र, श्री.रुद्रप्रताप तिवारी उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष श्री अजय चालेकर भाजपा तालुका उपाध्यक्ष, श्री विकी लाडसे सरपंच, श्री मनोज ठेंगणे,सौ दुर्गा बावणे सौ कल्पना घुमे सौ चंद्रकला आसुटकर श्री.विजय माशिरकर, श्री.डॉ झाडे, श्री.निशिकांत पिषे, श्री.अशोक पटेल, श्री.महेश येनुरकर, श्री.सुदर्शन नीसाद इत्यादी उपस्थित होते.