सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मौजे घोडदरा येथील विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी मारेगाव येथे रोज येत असतात. परंतु बस सेवा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना घोडदरा ते मारेगाव येण्याजाण्यासाठी आटापिटा करावा लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाची निकड लक्षात घेऊन बस सेवा सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश आत्राम यांच्या नेतृत्वात वणी आगार प्रमुखांना निवेदनातून करण्यात आली. विशेष म्हणजे,घोडदरा ते मारेगाव बस सेवा सुरू करण्यासाठी ग्राम.पं.घोडदरा मासिक सभा दि.10/06/2024 रोजी ठराव सुद्धा घेण्यात आला आहे.
निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते तथा प्रा. शैलेश आत्राम, विनोद आत्राम, शितल परसुटकर नलू धोबे, वंदना राऊत, मेघा सहारे, रत्नमाला नेहारे, प्रतिभा धोबे, सुरेख मेश्राम, सरीता राऊत, हरिदास वऱ्हाटे, प्रकाश सोनटक्के, रघुनाथ आवारी, राजू नवले, नारायण ठाकरे, प्रमोद चांदेकर आदींची उपस्थिती होती.