संजय खाडे यांचा झंजावत प्रचार...


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : इंडिया आघाडीचा प्रचार वणी मतदार संघात झंझावात सुरु आहे. काँग्रेसचे नेते, इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्ते प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराला जोमाने लागलेले दिसत आहेत. त्यात कापूस पणन महासंघाचे संचालक व काँग्रेसचे संजय खाडे व सहकारी श्रीमती धानोरकर यांच्या प्रचारार्थ वणी विधानसभा क्षेत्रात ते प्रामुख्याने फिरत आहे. कॉर्नर सभा, गृहभेटीचा त्यांनी धडाका लावला आहे. त्यांच्या बैठका व सभेला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहेत.

होऊ घातलेल्या निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत. त्यामुळे रोज एक भाग निवडून त्या भागात रात्री उशिरापर्यंत प्रचार कार्य सुरु आहे. आतापर्यंत जवळपास 40 ते 50 गावांचा दौरा करण्यात आला आहे. या प्रचार मोहिमेत प्रा. शंकर व-हाटे, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, उत्तम गेडाम, अनिल भोयर, जितेंद्र बोंडे यांच्यासह गावातील काँग्रेस, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. तसेच इतर टीमचाही जोमात प्रचार सुरु आहे. 

महागाई, बेरोजगारी आणि संविधानाची रोज होणारी पायमल्ली याने सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात संताप असल्याचे प्रचारा दरम्यान दिसून येत आहे. यावेळी मतदारांनी भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारांचा भाजपविरोधात संताप असून यावेळी सर्वसामान्य मतदार भाजपला धडा शिकवणार आहे.

- संजय खाडे
काँग्रेस नेते तथा संचालक कापूस पणन महासंघ