सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे अश्लील क्षणचित्रे सोशल मिडियावर शेअर करून तीची बदनामी केल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून अनिल लेतू आत्राम (28) रा. सुसरी असे संशयित आरोपीचे नाव आहे.
वणी तालुक्यातील विद्यार्थीनी ही त्याच तालुक्यातील एका महाविद्यालयमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याचे समजते. पिडीत युवतीचे संशयित आरोपी हा तिच्या नात्यातीलच असल्याचेही समजते. अशातच या दोघांचे मनोमिलन होत गेले आणि एकमेकांची जवळीकता वाढली. सिर्फ तुम म्हणत "शुभमंगलम सावधान" च्या आणाभाका घेतल्या. दरम्यान,च्या वारंवार भेटीगाठीने दोघांपैकी एकाच्या घरचा या राजाराणी च्या जोडीचा प्रतिबंध असल्यामुळे आरोपीने लग्न कार्यातून माघार घेतल्याने पिडीतेने त्याचा "ध्यास"च अंतरंगातून काढून टाकत ओन्ली 'स्टडी' वर फोकस केले.
दरम्यान च्या काळात पीडित युवती वसतिगृहाकडे जात असतांना संशयित आरोपीने तिला शस्त्राचा धाक दाखवून इम्पॉर्टन्ट आहे, चल म्हणून तिला दुचाकी वर बसून दोघे गेले. शहराच्या निर्जनस्थळी जाऊन जबरदस्तीने रासलीला करित विवस्त्र अवस्थेत तीचे क्षणचित्रे काढले. धाक दाखवून नको ते मोबाईल समोर बोलायला लावले आणि या सर्व अश्लील प्रकाराचे 'शूट' सुद्धा केले. त्यानंतर दोघे परत आले आणि वणी शहरातील मुख्य चौकात तीला सोडून संशयित आरोपी निघून गेला. मात्र,आरोपी इथेच थांबला नसून त्याने घरून व्हिडीओ कॉल वर अंगप्रदर्शणास तिला पुन्हा भाग पाडले. या घटनाचे शुट करून त्याचे स्क्रीन शॉट काढले व त्याने "फेसबुक"या सोशल माध्यमातून व्हायरल केल्याने माझी बदनामी झाली असा, थेट आरोप करत पिडीतने मारेगाव पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली.
मारेगाव पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशीघ्र करून पोलीस उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत, राजू टेकाम यांनी आरोपीला हैद्राबाद येथून अटक केली असून त्यांचेवर विविध कलमान्वये तसेच सह कलम व माहिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.