नवरगांव येथे वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : अखिल भारतीय श्री.गुरुदेव सेवा मंडळ नवरगाव  येथे रविवार दिनाक 18/2/2024 ला वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 55 वा पुण्यस्मरण सोहळा साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गंगाधर महाराज लोनसावळे, तालका कीर्तनकर प्रमुख अतिथी व मार्ग दर्शक श्री सुधाकर भाऊ धानोरकर, मध्यवर्ती प्रतिनिधी श्री राजू भाऊ सिडाम, तालुका प्रचार प्रमुख श्री दिगांबर कुमरे, तालुका प्रचारक श्री मारोती राजूरकर, तालुका प्रचारक श्री संतोष आस्वले, तालुका कृषी प्रमुख श्री गणेश लोनसावळे, तालुका युवा प्रचारक तसेच लांडे दादा, कोसारकर दादा, विठ्टल राव आदबाले जेष्ठ प्रचारक मैसदोडका, रामदास दुर्गे, मते दादा सगणापुर, बाबाराव आत्राम ज्येष्ठ प्रचारक सराटी, सौ.चंदा ताई सिडाम, सकुबाई केगाव यांचे उपस्थितीत व समस्त नवरगाव ग्राम वासी हजर होते.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री रवि भाऊ, तर आभार पवन मोहुर्ले, यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्र वंदनेने करण्यात आली.