युवकाने घेतला राहत्या घरी गळाफास

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : शहरात लगत असलेल्या वागदरा येथील एका युवकाने गळाफास घेवून आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रतीक किशोर पावडे (21) रा वागदरा (जुना) असे गळाफास घेवून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. दुपारी दोन वाजता च्या सुमारास प्रतीक बाहेरून आला समजते, दरम्यान घरी कोणीच नसल्याचे पाहून त्याने राहत्या घरीच गळाफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. प्रतीक च्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याचे पश्चात आई वडील व एक भाऊ असा आप्त परिवार आहे.

पुढील तपास वणी पोलीस करत आहे.