कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विध्यार्थिनी वर्षा आत्रामची भाला फेक मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : आज दिनांक 24/01/2023 रोजी यवतमाळ येथील नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या विभागीयस्तरीय 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव ची 11 वि कला शाखेची विध्यार्थीनी वर्षा विनोद आत्राम हिने भाला फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवीला आहे. त्यामुळे तिने प्राप्त केलेल्या यशामुळे तिची निवड राज्यस्तरीय भाला फेक स्पर्धेसाठी झाली आहे. तिने मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल तिचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.
वर्षा ही मारेगाव तालुक्यातील खंडणी येथील रहिवाशी मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल आहे तसेच विकासच्या दृष्टीने इतर तालुक्याच्या तुलनेत मागासलेला आहे तरी सुद्धा खंडणी सारख्या लहानशा गावातून येऊन तिने मिळवलेले यश हे खरच कौतुकास्पद आहे . तिला मुळातच लहान पणा पासून मैदानी स्पर्धेमध्ये आवड असल्यामुळे ती नियमित पणे सराव करत होती.
वर्षा ही विध्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून येतात तसेच सामान्य शेतकरी कुठंबातील आल्यामुळे तिचे विशेष करून कौतुक केले जात आहे. मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु असे असून सुद्धा कला वाणिज्य विज्ञान क.महाविद्यालयात विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम सर्व प्राध्यापकाकडून वेळोवेळी केल जात. महाविद्यालयांचे असलेलं भव्य मौदान विध्यार्थ्यांचा खेळप्रति उत्साह द्विगुणित करते. विध्यार्थांकडून नियमित पणे क्रीडा शिक्षकाने करून घेतलेला सराव तसेच विध्यार्थांची खेळप्रति असलेली तळमळ,आत्मीयता या सर्व बाबींमुळे वर्षाने यश संपादन केलेलं दिसून येतात. त्यामुळे तिच्या या कठीण मेहनतीचे तिला फळ मिळालेलं आज झालेल्या स्पर्धेत तिने प्राप्त केलेल्या यशातून निदर्शनास येते.
तिने तिच्या यशाचे श्रेय मारेगाव तालुका क्रीडा संयोजक काकडे सर व महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद आणि तिच्या आई वडिलांना दिले आहे .
वर्षा ने मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे सर व प्राचार्य हेमंत चौधरी सर व तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी वर्षा चे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.