ठाणेदार जाधव यांचेकडुन धावण्याचे जोडे वाटप

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : परिश्रम वाचनालय मुकूटबन येथे शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता पोलीस भरतीसाठी मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुकूटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव यांच्या कडुन शारीरीक चाचणीसाठी धावण्यासाठी लागणारे धावण्याचे जोडे (रनिंग शू) चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सहयोग ग्रुपचे सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक सुरेन्द्र गेडाम, प्रा. गजानन गद्दलवार, डॉ. नेताजी पारशिवे, अध्यापक विलास चिट्टलवार उपस्थीत होते. ठाणेदार जाधव विद्यार्थीना मैदानी शारीरीक चाचणी बद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चिट्टलवार यांनी केले. या प्रंसगी पोलीस भरतीसाठी मैदानी तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.