झरी जामणी तालुक्यात युवक काँग्रेस आक्रमक-राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : तालुका युवक काँग्रेस पार्टी व शेतकरी व कष्टकरी मजूर वर्ग यांच्यावतीने शासनाच्या विरोधात २ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करणार आहे. तहसीलदार झरी जामणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका समन्वय एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी), पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मंगळवारी (२७ डिसेंबर) निवेदन देण्यात आले.
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती मालाचा पीक विमा काढला. विमा कंपनीने अक्षरशा शेतकऱ्यांची लूट सुरू असून कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक विम्याच्या लाभ दिला नाही. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीची मदत दिली याचा अर्थ नुकसान झाले. परंतु विमा कंपनीने शेतकऱ्यांना कसलीही मदत केली नाही. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के विमा मिळावा, शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, महात्मा फुले प्रोत्साहन निधी त्वरित देण्यात यावी. अतिवृष्टीचे १००% टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, हेक्टरी १३ हजार ६०० रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी शासनाच्या विरोधात २ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करणार आहे. 
अनेक वेळा उपोषण व धरणे आंदोलन

महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी युवक काँग्रेस ने अनेक वेळा उपोषण व धरणे आंदोलन केले असून मुकुटबन येथे पाटण मुकुटबन मार्गावर तुरीचे चुकारे साठी टायर पेटऊन चक्का जाम आंदोलन, तहसील कार्यालय समोर आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या विरोधात बेरोजगार युवकांना कामावर घेण्यासाठी उपोषण, हमालीचे पैसे तत्काळ देण्यात यावे व चना चुकाऱ्यासाठी तीन दिवस आमरण उपोषण, रुईकोट ते पाटणबोरी रस्त्यासाठी आंदोलन, बेरोजगार युवकांसाठी भजे तळा आंदोलन, पाटण ते झरी रस्त्यासाठी आंदोलन, चाळीस गावात आरोग्य शिबिर घेऊन चष्मे वाटप करून शस्त्रक्रिया करून घेतल्या, जनतेच्या समस्या निवेदनच्या माध्यमातून सोडल्या, निराधार लोकांना सतत मदत करणे. अशा प्रकारची अनेक आंदोलने, उपोषण व समाजसेवेची कामे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, दिग्रसचे सरपंच व तालुका सरपंच संघटनाचे अध्यक्ष नीलेश येल्टीवार, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल धांडेकर यांंचे नेतृत्वात हरिदास गुर्जलवार, संतोष जंगीलवार, सचिन टाले, गंगाधर आत्राम, रमेश संकसनवार, प्रतिक गंड्रतवार, राकेश गालेवार, चेतन मॅकलवार, नितिन खडसे, श्रीकांत आनुकुमवार, शंकर आकुलवार यांचे तर्फे केल्या गेले हे उल्लेखनीय आहे.