सह्याद्री चौफेर | न्यूज
यवतमाळ : येत्या काही दिवसात अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक होऊ घातली आहे.
ग्रामीण व शहरी भागामधील सर्व क्षेत्रातील पदवीधरांना नोकरी विषयक, उद्योग विषयक, शेती विषयक, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचविण्याकरीता व सर्व पदवीधरांना दैनंदिन जिवनामध्ये येणाऱ्या समस्यांना न्याय देण्याकरीता पदवीधरांच्या सशक्तीकरणाकरिता संघठीत होणे गरजेचे आहे. त्याकरीता सर्व पदवीधरांना आव्हान करण्यात येते की, पदवीधर नोंदणीवर क्लीक करुन नोंदणी करावे.
आता शासनाची अधिकृत संकेत स्थळ उपलब्ध झाले आहे. या https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/Graduate2023.aspx संकेत स्थळावर विभागातील पदवीधरांनी आपलं नाव नोंद करून घ्यावे. काही अडचण आल्यास मी स्वतः धनंजय आसुटकर पदवीधर या नात्याने संपर्क साधावा..असे आवाहन धनंजय आसुटकर यांनी केले.
आपण पदवीधर आहात अर्थात बुद्धिजीवी वर्गात आपण मोडतो. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. लोकशाहीचा सन्मान म्हणून आपण आपली पदवीधर मतदार नोंदणी करूया, एक जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडूया असंही ते म्हणाले.
टीप - सदर मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१९ अगोदर पदवीधर असणे महत्वाचे आहे. पदवीधर मतदार नोंदणी साठी Online अर्ज भरण्यापूर्वी आपला पासपोर्ट फोटो, मूळ आधार कार्ड, आणि मूळ पदवीची गुणपत्रिका तसेच आपल्या स्वाक्षरीचा फोटो काढून ठेवावा. हे सर्व फोटो मोबाईलचे गॅलरीत थोडे क्रॉप करुन save करून ठेवावे. मग https://ceoelection.maharashtra.gov.in/graduate/Graduate2023.aspx या लिंकला touch करून एक एक माहिती भरत जावी...! शेवटी choose file करून वरील फोटो अपलोड करुन फॉर्म सबमिट करावा...!
उपरोक्त लिंक ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत लिंक असून सर्व पदवीधर मतदारांनी मनात कोणतीही शंका न ठेवता नोंदणी करावी,असे सांगितले.
धनंजय विनोद आसुटकर
अध्यक्ष - युवक कॉंग्रेस कमिटी, मारेगाव
मो. नं - ९५५२९१४८८२