कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
मारेगाव : तालुक्यात अवैध मटका, अवैध दारू हा विषय नसून आता अवैध गौण खनिजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गौण खनिजासाठी प्रसिद्ध असलेल्या नरसाळा येथील नेहमीच गौण खनिजाची राजरोसपणे लूट होते. याचा प्रत्यक्ष अनुभव नरसाळा येथील जनतेला आला.
धामणी येथील तलावाच्या हद्दीतील शेकडो ब्रास मुरुम चव्हाण स्टोन केशर संचालकांने वाहन क्रमांक एम एच २९ बी ई ४१५५, व वाहन क्रमांक एम एच बी ई ०१५३ सहाय्याने गायब केला आहे. या मुरमाची लूट नरसाळा येथील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सुरू असल्याची तक्रार तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे.
शेकडो ब्रास मुरमाचे उत्खनन राजरोसपणे होत असून यावर प्रशासनाचे एवढी डोळेझाक का, असा सवाल रवि बाभळे कडुन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, धामणी येथील असलेल्या तलावाच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन महसूल विभागाच्या मेहेरबानीने सुरू असल्याची चर्चा आहे. याच मेहरबानीच्या वरदहस्ताने मुरूम पळवला जात असून विना रॉयल्टी तलावाच्या जमिनीवर अवैध मुरम उपसा होत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुरमाच्या उत्खननावर ना पाटबंधारे विभागाचे लक्ष आहे, ना महसूलचे. यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडवला जात तर आहेत परंतु, दमडी खिशात घालण्याचे काम जोमात सुरू आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत अवैध मुरम उपसा केलेल्या जागेचे मूल्यमापन करून चव्हाण स्टोन केशर संचालकावर कारवाई करावी तसेच अशा अवैध प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तंटामुक्ती अध्यक्ष रवी बाभळे यांनी केले आहे. तरी या अवैध मुरूम उपसा करणाऱ्यावर शासन काय कारवाई करतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.