उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे बांबू प्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या स्वप्नातील हरित चंद्रपूर साकार होण्याची प्रेरणा मिळावी म्हणुन भाजप विधी प्रकोष्ठ ने बांबूची रोपे वाटून त्याचे महत्त्व सांगण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम रविवारी घेतला.
विधी प्रकोष्ठ चे जिल्हाध्यक्ष ऍड. हरीश मंचलवार यांच्या संकल्पनेतून मुनगंटीवार यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून ईतर अनेक उपक्रम सुद्धा यशस्वीरित्या संपन्न झाले. यात छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम सचिन कोतपेल्लीवार अध्यक्ष बाजार मंडळ भाजपा महानगर, सूर्यकांत कुचनवार सचिव बाजार मंडळ भाजपा, रवी लोणकर अध्यक्ष मंडळ, सौ खुशबू अंकुश चौधरी माजी झोन सभापती, ॲड. किरण पाल महामंत्री विधी प्रकोष्ठ, ॲड. श्रीकांत कवटलवार महामंत्री विधी प्रकोष्ट, सौ रेणुका घोडेस्वार उपाध्यक्ष महिला मोर्चा,ॲड. योगेश पचरे, येल्ले यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. दरम्यान रवी जी घरोटे, विठ्ठलराव मूळपल्लीवार, वामनराव आमटे, नंदकिशोर लिंगलवार यांचे विशेष स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.हरीश मंचलवार जिल्हाध्यक्ष विधी प्रकोष्ठ चंद्रपूर महानगर यांनी केले. संचालन गणेश रासपायले अध्यक्ष काळाराम क्रीडा प्रसारक मंडळ यांनी केलें. भाजपा विधी प्रकोष्ठ व पठाणपुरा वार्ड,दादमहाल वार्ड, समाधी वार्ड मित्रपरिवार यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजीत या उपक्रमात 300 ते 400 लोकांनी सहभाग दर्शविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश रासयले, सचिन कथलकर, शेखर चीलपवार, पवन रासेकर, योगेश चहारे, अक्षय पाचपोर, सुनील बोभाटे, मंगल शेडमाके, सुनील चांदेकर, विजय डोमलवार, गणेश मंचलवार, अरुण गड्डमवार, संजय रोहनकर, भारत चव्हाण, डुग्गु चहारे, सनाथ ताटकंटीवार यांनी अथक परिश्रम घेतले.
ॲड.हरीश मंचलवार यांनी पर्यावरण, बांबूच्या झाडा संबंधी माहिती दिली, शिक्षणाचे महत्त्व, सांगितले.