बांबूची रोपे देऊन करणार मुनगंटीवार यांचा गौरव...

उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर 

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातील योजना म्हणुन बीआरटीसी चा उल्लेख केला जातो. याच बांबू ची रोपे वाटून भाजपा विधी प्रकोष्ठ पर्यावरण संरक्षणाचा सन्देश देणार असल्याची माहिती प्रमुख ॲड. हरीश मंचलवार यांनी दिली आहे.

बांबू ईतर वृक्षांच्या तुलनेत चार पट कार्बन शोषून घेतो. त्यामुळे त्याला फ्युचर मटेरियल म्हणतात. अश्या बांबू ची रोपे वाटून समाजाला बांबू शेती, हस्तकला, पारंपरिक कलेचे जतन, पर्यावरण संवर्धन, रोजगार निर्माण करणाऱ्या समाजाचे प्रोत्साहन असा संदेश देणार असल्याची माहिती ॲड. हरीश मंचलवार यांनी दिली.
माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर चंद्रपूर घडविण्यासाठी बांबू ला फ्युचर मटेरियल म्हणुन आमदार सुधीर मुनगंटीवार अथक परिश्रम करत असुन त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणुन प्रबोधन करणार असल्याची माहिती ॲड. मंचलवार यांनी दिली.

 30 जुलै रोजी समाधी वार्ड येथे शैक्षणिक साहित्य वितरणआणि दादमहल, वार्ड येथे छत्री वाटप करणार असल्याची माहिती देत ॲड. मंचलवार, अनिल चहारे, प्रशांत भाऊ गहुकर,नितीन कथलकर,सचिन कथलकर आकाश टेंभुरकर, तुषार पेंदोर, बंटी आत्राम, चंद्रगुप्त कातकर, संजय रोहणकर, राज हजारे, गजानन आकनुरवार, सचिन गड्डमवार,भारत चव्हाण,योगेश चहारे, अक्षय पाचपोर, शेखर चीलपवार महेश मंदरे रुपेश राजूरकर, सुनील बोभाटे, नितीन निलेवार, राहुल कोहळे, गणेश मंचलवार यांनी दीली आहे.
सुधीर मुनगंटीवार यांनी रोजगार देणाऱ्या हातांचे स्वप्न पाहिले आहे. ते साकार करण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबवणार असल्याची माहिती येथे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे.