संजय देरकर सहाव्या फेरीत आघाडी वर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : पहिल्या फेरीपासून संजय देरकर हे आघाडी वर असून सहावी फेरीत त्यांना मिळालेली एकूण मते 20101 तर संजीव रेड्डी बोदकुरवार यांना एकूण मिळालेली आतापर्यंत ची मते 16067 इतकी समोर आली. बोदकुरवार यांच्या एकूण मते देरकर 4034 मतांनी आघाडी वर आहे. त्यामुळे संजय देरकर विजयाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसून येतेय...
सातवी फेरीत सुद्धा आघाडी असल्याचे अपडेट्स समोर येत आहे. त्यांना 24144 तर बोदकुरवार यांना सातव्या फेरीत 18320 अशी आहे. 

आठवी फेरी 
देरकर - 27803
बोदकुरवार -22356

देरकर 5447 मतांनी आघाडीवर

नववी फेरी 
देरकर - 31402
बोदकुरवार -26348

देरकर 5054 मतांनी आघाडीवर

दहावी फेरी 
देरकर - 35130
बोदकुरवार -31354

देरकर 3776 मतांनी आघाडीवर

11 फेरी झाले 2067 आघाडी


12 वि पूर्ण 2867 आघाडी मशाल 
13 फेरी ३५०० लीड मशाल

चौदावी फेरी 
देरकर - 49937
बोदकुरवार -46283

देरकर 3654 मतांनी आघाडीवर

पंधरावी फेरी 
देरकर - 54195
बोदकुरवार - 49388

देरकर 4807 मतांनी आघाडीवर

सोळावी फेरी 
देरकर - 58884
बोदकुरवार -52796

देरकर 6088 मतांनी आघाडीवर

सतरावी फेरी 
देरकर - 62198
बोदकुरवार - 55389

देरकर 6809 मतांनी आघाडीवर

आठरावी फेरी 

देरकर - 66323
बोदकुरवार - 57742

देरकर 8581 मतांनी आघाडीवर

एकोणीवास फेरी 

देरकर - 70605
बोदकुरवार - 60141

देरकर 10464 मतांनी आघाडीवर

विसावी फेरी 

देरकर - 75901
बोदकुरवार - 62942

देरकर 12959 मतांनी आघाडीवर

एकोणविस फेरी 

देरकर - 70605
बोदकुरवार - 60141

देरकर 10464 मतांनी आघाडीवर

विसवी फेरी 

देरकर - 75901
बोदकुरवार - 62942

देरकर 12959 मतांनी आघाडीवर

एकवीस फेरी 

देरकर - 79818
बोदकुरवार - 67020

देरकर 12798 मतांनी आघाडीवर

बावीस फेरी 

देरकर - 84003
बोदकुरवार - 72002

देरकर 12001 मतांनी आघाडीवर

तेवीस फेरी 

देरकर - 88468
बोदकुरवार - 75218

देरकर 13250 मतांनी आघाडीवर

चोवीस फेरी

देरकर - 92584
बोदकुरवार - 77675

देरकर 14909 मतांनी आघाडीवर

पंचवीस फेरी

देरकर - 94618
बोदकुरवार - 79058

संजयभाऊ देरकर 15560 मतांनी विजयी

श्री. अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!

सह्याद्री न्यूज | वृत्तसंस्था 

जीवनप्रवासात आयुष्य जगत असतांना ह्या सुंदर भूतलावर आपण जन्माला आलो याचा आनंदोत्सव म्हणून जन्मदिवस साजरे होतात आणि होतच राहतील पण काही व्यक्तीमत्व अशी असतात ज्यांचे जन्मदिवस फक्त स्वतः पुरताच आनंदोत्सव साजरा करण्याकरीताच करत नाहीत तर आपला जन्मदिवस साजरा होतांना .. दुसऱ्याच्यां जीवनात आनंद कसा निर्माण करेल ह्याच भावनेतून साजरे केले जातात आज ज्यांचा वाढदिवस सोहळा आहे ते व्यक्तीमत्व म्हणजे वणी, वणी तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण आपल्या वणी विधानसभा क्षेत्रात सामाजिक कार्याच्या माध्यमातून ज्यांनी समाज्यात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे सोबतच पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनात आपलं अनमोल योगदान देत खऱ्या अर्थानं निसर्गप्रेमी म्हणून नावारूपाला आलेलं व्यक्तिमत्व अर्थात युवासेना चे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय. श्री अजिंक्य भाऊ शेंडे या युवा दिलाचा दिलखुलास, दिलदार व्यक्तीमत्वाचा आज "वाढदिवस".

आजचा दिवस खऱ्या अर्थाने अनेक समाजपयोगी कार्यांच्यां पर्वणीचाच दिवस म्हटलं तर वावगं ठरणारं नाही ! 
अजिंक्य शेंडे यांच्या जन्मदिना निमित्त ह्या संवेदनशील मनाच्या आणि दिलदार स्वभावाच्या महानुभवांनीं एक हृदयस्पर्शी कार्य केलं ते म्हणजे कोरोनाकाळात गरज असलेल्या गरजू रुग्णांना घरपोच ऑक्सिजन सिलेंडर सेवा दिली. वणी आगारातून चंद्रपूर निघालेल्या बस च्या बिघाड पाहून होणारा अपघात त्यांनी टाळला, त्यात 30 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले. येथील जाधव कुटुंबियांना मदतीचा दिला. कॅन्सर ग्रस्त बालक युग ला मदतीला सरसावले. बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील अबाल वृद्ध जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.

ह्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्या दिनी शिवसेना उबाठा नेते संजय भाऊ देरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, प्रत्येक माणसाची यशस्वीता ही त्याच्या कार्यावर अवलंबून असते. अजिंक्य शेंडे यांचा जन्मदिवस म्हणजे ह्या समाजासाठी एक आनंदाची पर्वणीच. अजिंक्य शेंडे हे रात्रंदिवस मदतीला धावून सामाजिक दायित्व करित असतात. विद्यार्थी, नागरिक यांची सुविधा सेतू केंद्रातून होणारी आर्थिक लूट थांबवावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ सेतू केंद्र बंद करण्याची मागणी केली. सामाजिक कार्यकर्ता व उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करताना अजिंक्य शेंडे हे फक्त शहरांपुरतं मर्यादित न राहता ह्या वणी विधानसभेत राहणाऱ्या समाज बांधवां करीता एक आशेचा किरण बनून सदैव गरजूच्या पाठीशी अहोरात्र उभे राहतात. आणि या पुढे आपण सर्वांनी पण पुढाकार घेत राजकारण बाजूला सारून सामाजिक कार्य कसे करता येतील याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून ह्या अभिष्टचिंतन सोहळ्या दिनानिमित्त वणी विधानसभा क्षेत्रातील तमाम बांधवाकडून त्यांच्या कार्यास दंडवत..
युवा आनंदोत्सवच म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री अजिंक्य शेंडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

आता उत्सुकता निकालाची, अपक्ष-पक्षाकडून आपलाचा उमेदवार निवडून येण्याचे गणित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : यंदा विधानसभेत काट्याच्या लढतीचे चित्र दिसून आले. त्यांचे भवितव्य 'इव्हीएम'मध्ये बंद झाल्यानंतर आता दावे-प्रतिदाव्यांना ऊत आला आहे. निवडणुकीत बदलाचे वातावरण होते. त्यात बाजी मारू, असा दावा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते करीत आहे. तर अशी हवा सुरुवातीपासूनच निर्माण झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊन आम्हीच जिंकू, असा विश्वास महायुतीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यावेळी परिवर्तन की, हवा गुल होणार? याचा फैसला अवघ्या काही तासांत कळणार आहे.

या निवडणुकीत चौरंगी लढत झाल्याची चर्चा होती, मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर विरुद्ध भाजपाचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात थेट लढत झाली. आघाडी वर्सेस महायुती एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने बिग फाइट म्हणून या लढतीकडे पाहिले जाते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष येथील निकालाकडे लागले आहे.

देरकर यांनीही चार टर्म निवडणूक लढवली, तर बोदकुरवार दोन वेळा आमदार राहिले. पक्ष, सामाजिकपातळीवरही नेतृत्व सिद्ध केले आहे. कसलेले नेते आणि एवढ्या वर्षांच्या राजकीय अनुभवातून दोन्ही बाजूंकडून ताकदीने निवडणूक लढविण्यात आली. डोअर टू डोअर भेटी, छोट्या-मोठ्या सभा, वेगवेगळे प्रचार साहित्य, पक्षाची यंत्रणा राबविली, डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व आयुधांचा वापर करण्यात आला.

या सर्व रणधुमाळीनंतर आता निकालाच्या चर्चा रंगल्या आहेत. या ठिकाणी कुणबी, आदिवासी समाजाच्या मतांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या आधारावर सरळसरळ सामाजिक, धार्मिक विभागणी करून विविध समीकरणांचे आडाखे बांधले जात आहेत. आघाडी चे उमेदवार सर्वच समाजांत वाटेकरी ठरतील, असा दावा केला जातो. प्रचारात ते दिसूनही आले; परंतु याचे रूपांतर मतदानात किती होईल, यावर विजयाचे गणित अवलंबून असेल. तर राज्यकर्त्यांवर विशिष्ट समुदायांची असलेली नाराजी, शेतमालाचे भाव; तसेच बदलाचे वातावरण, याचा लाभ महाविकास आघाडीला होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बुथनिहाय आकडेवारी घेत गुलाल आम्हीच उधळणार असा दावा केला जात आहे.

वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर?
वणी मतदारसंघात ७४.८७ टक्के मतदान झाले. काही गावांत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यामुळे टक्केवारी वाढली असून, वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच मनसे, वंचित, भाकपा यासह काही अपक्ष निवडणूक रिंगणात होते. हे उमेदवार किती मते घेतात, कुणाचे गणित बिघडवतात का, याचा परिणाम निकालावर होऊ शकतो.

घोडदरांच्या सरपंचा आत्राम यांना कोर्टाचा दिलासा


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : नुकतेच अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी संतोष रोंगे यांचे अर्जावरुन मारेगाव तालुक्यातील घोडदरा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सौ. सुनंदा अशोक आत्राम यांना सरपंच पदावरून अपात्र करण्याचा आदेश निर्गमित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. या आदेशाला सौ. सुनंदा अशोक आत्राम, सरपंच, घोडदरा यांनी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले असता, अपर जिल्हाधिकारी यांच्या 'त्या' आदेशाला अपर विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगनादेश मंजूर केला आहे.

संतोष रोंगे यांनी सरपंच सौ.‌ सुनंदा अशोक आत्राम यांचे राहते घर सरकारी जागेवर असून त्यावर पक्के बांधकाम करण्यात आले आहे, असा आरोप करीत सरपंचाचे पद अपात्र घोषित करणेकरीता अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जावर अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी सौ. सुनंदा आत्राम, सरपंच यांचे सभासदत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. याप्रकरणी अपर जिल्हाधिकारी यांनी सचिवांच्या अहवालातील खाडाखोड व त्रुटीकडे दुर्लक्ष तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती, मारेगाव कडील अभिलेख्याची पडताळणी न करता आदेश पारीत केल्याने‌ या आदेशाला सौ. सुनंदा अशोक आत्राम, सरपंच, घोडदरा यांनी अपर विभागीय आयुक्तांचे न्यायालयात धाव घेऊन आव्हान दिले असता, अपर जिल्हाधिकारी यांच्या 'त्या' आदेशाला अपर विभागीय आयुक्तांनी पुढील आदेशापर्यंत स्थगनादेश मंजूर केला आहे.

याप्रकरणी पुढील सुनावणी दिनांक ११/१२/२०२४ रोजी होणार आहे. या प्रकरणी सौ सुनंदा आत्राम यांच्या वतीने ॲड. निखिल लोंदे, ॲड. निखिल सायरे, ॲड. रंजित अगमे, ॲड. श्रीकृष्ण खोब्रागडे व भुषण ब्राह्मणे यांनी न्यायालयात बाजू मांडली.


अपघात....अज्ञात वाहनाच्या धडकेत आय टी आय विद्यार्थी ठार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : येथील आय टी आय करून गावाकडे जाणाऱ्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी दुपारी 5 वाजताच्या सुमारास उमरी मार्गांवर घडली.

उमरघाट येथील विद्यार्थी राजकुमार दडांजे (वय 20) उमरी (ता. झरी जामणी) हा वणी येथे आय टी आय आला होता, आज सुद्धा आय टी आय करून नेहमीप्रमाणे दुचाकीने उमरीघाट गावाकडे निघाला. अशातच कायर मार्गे भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने उमरी गावानजीक दुचाकी क्र. (एम एच 29-एपी,7741) ला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार राजकुमार हा जागीच ठार झाला. वृत्त लिहेपर्यंत पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल व्हायची होती.