सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : ग्रामीण भागात घरी गॅस जोडणी नसल्यामुळे जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्यावर स्वयंपाक व सरपणाकरिता सर्रास वापर करतात. त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते. ही बाब लक्षात घेऊन केगांव येथील मारेगाव वनविभागाकडून गॅस सिलिंडरसाठी देण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही, मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही, या अपेक्षेने चोखाजी गॅस एजन्सी व वन विभागाने ही महत्वपूर्ण योजना आखली आहे़.
केगांव येथील गरीब कुटुंबांना मारेगांव वनविभागतर्फे 75 टक्के गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. केगांव वनरक्षक प्रेमीला सिडाम मॅडम यांच्या हस्ते दि. 28 डिसेंबर ला सकाळी 10 वाजता गावातील 21 लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले.
यावेळी चोखाजी गॅस एजन्सीचे संचालक राजू भाऊ दारुण्डे, जोत्स्ना आडे, राहुल भगत कर्मचारी, व सरपंच, वन समिती अध्यक्ष तसेच गावातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत गॅस किटचे वितरण करण्यात आले.