वणी एमआयडीसी परिसरातील ऑईल मिलमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना अटक

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : येतील एमआयडीसी परिसरातील टू सन्स ऑईल मिलच्या आवारातील वस्तू व साहित्याची चोरी करू पाहणाऱ्या दोन चोरट्यांना तेथे सतर्क असलेल्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना काल २२ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. अनिकेत दादाराव कुमरे (२०) रा. सिंधी (कुंभा) व सागर उर्फ गोल्या मोहन फुसाटे (२६) रा. भिमनगर अशी या चोरट्यांची नावे आहेत. हे चोरटे या आधीही तुरुंगवारी करून आले आहेत. तुरुंगात मित्र बनलेल्या या दोघांनी मिळून चोरी करण्याचा डाव आखत एमआयडीसी परिसरातील या ऑईल मिलला टार्गेट केले. पण तेथील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा चोरीचा डाव फसला, व परत त्यांना तुरुंगवारी घडली. 
वणी एमआयडीसी परिसरात असलेल्या टू सन्स ऑईल मिलच्या आवारात काल सायंकाळी ५ वाजता अनिकेत कुमरे व सागर उर्फ गोल्या फुसाटे या दोन चोरट्यांनी प्रवेश केला. मिलच्या आवारात ठेऊन असलेले २० किलोचे वजन व आर्म केबल चोरून नेण्याच्या तयारीत असलेल्या या दोन्ही चोरट्यांना मिल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रंगे हाथ पकडले. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे या दोन्ही चोरट्यांचा चोरीचा डाव फसला. या दोन्ही चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दोघांवरही चोरीचा गुन्हा दाखल करून आज २३ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी दोन्ही चोरट्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

आधीच चोरीचे अनेक गुन्हे शिरावर असलेला अट्टल चोरटा रुग्णालयातून पसार झाल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गब्ब्याचा शोधा शोध सुरु असतांनाच गब्ब्या स्टाईल चोरी करणारे हे दोन चोरटे पोलिसांच्या हाती लागले. चोरीची वेळोवेळी कर्तबगारी दाखविणाऱ्या या चोरट्यांना पोलिसांनी चांगली अद्दल घडविल्यास त्यांचे वारसदार तयार होणार नाही.

वणीत राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात सदस्य नोंदणीला प्रारंभ; वणी उपविभागातील युवकांचा पक्ष प्रवेश सोहळ्यात उत्साहात संपन्न


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : येथील जैताई मंदीर जवळ दि.22.02.2022 ला सायंकाळी 4 वा. कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमा साठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. चे उपाध्यक्ष मा. बाळासाहेब पाटील (कामारकर) हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कानारकर हे सुद्धा उपस्थित होते, वणी विभागातील राष्ट्रवादी कार्यरत असलेले पदाधिकारी यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, 
कार्यक्रमाची सुरवात वणी विभागा मध्ये सदस्य नोंदणी चा शुभारंभ करण्यात आला, व युवक चा जिल्हा उपाध्यक्ष पदी धीरज कुचनकार, तालुका अध्यक्ष पदी हेमंत गावंडे यांची तर शहर अध्यक्ष पदी मनोज वाकटी यांची नियुक्ती करण्यात आली, व नियुक्तपत्र देण्यात आले.

वणी विभागातील युवकाचा पक्ष प्रवेश चा कार्यक्रम झाला या मध्ये शेकडो युवकांनी पक्ष प्रवेश केला आहे.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी केले, त्यानी वणी विभागातील प्रश्न मांडले, वणी मध्ये काम करत असताना कोणत्या अडचणी येतात यांचा पाढा वाचला, वणीतील नेते मुंबई ला जाऊन पक्षात प्रवेश करतात त्याचाकरीता पक्षातील कार्यकर्ते खुप मेहनत घेतात,पंरतु कालांतराने पक्षाला सोडुन जातात मागील 13 वर्षा पासुन आम्ही पक्षात सुरवाती पासुन काम करत आहे,परंतु आता पर्यंत या विभागातील नेते बदलत जातात, कार्यकर्तेची जेव्हा इलेक्शन येते तेव्हा नेतेच गायब होतात, आता आम्ही नगर पालिका-जिल्हा परिषद आम्ही लढवणार आहे आणि पक्षाला जिल्ह्यातून मदत करावी अशी मागणी केली, पक्षाचे वणी चे नेते विजयजी नगराळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यानी सुद्धा पक्षात काम करताना किती अडचणी येतात हे जिल्हय़ाच्या नेता समोर मांडले, तसेच वणी तालुका अध्यक्ष सूर्यकांत खाडे व मारेगाव तालुका अध्यक्ष भारत मत्ते सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर युवक चे जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ कानारकर यानी कार्यकर्त्यांना संबंधीत केले, ते आपल्या भाषणात युवकांनी येणा-या इलेक्शन जास्तीत जास्त टिकीट ची मागणी करावी त्याना आम्ही टिकीट देऊ आणि जिल्हातुन त्याना जेवढी मदत करता येणार तेव्हढी निश्चितच करण्यात येईल असे त्यानी म्हटले, पुढे बोलतानी ते म्हणाले की, जिल्हा परिषद मध्ये आपली सत्ता आहे आणि पुढे पण रहाणार आहेच, कुठले पण जनतेचे काम रहाले तर ते मार्गी लावण्यात येणार असे त्यानी आश्वस्त केले.
अध्यक्षीय भाषणात कार्यक्रम चे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर यांनी सबोधीत करताना कार्यकर्त्यांनी पक्षा सोबत एकनिष्ठ असणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय सहन करुन घेणार नाही. पक्षाची सत्ता जि.प. मध्ये आहे आणी महाराष्ट्र मध्ये पण आहे, कुठले पण काम असले तर वणी विभागातील लोकांना प्राधान्य देण्यात येणार, लोका साठी काम करणारा हा आपला पक्ष आहे, म्हणुन जनता आपल्या लोकांपर्यंत काम घेऊन येतात आणि आपण त्याना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करुया. कार्यकर्त्यांनी जिद्दीने सभासद नोंदणी ची सुरवात करावी ज्यानी नोंद केली असेल त्यालाच पक्ष टिकीट देण्यात येणार आहे, म्हणुन आपण सदस्य नोंदणीला लवकरात लवकर सुरवात करावी.
आभार प्रदर्शन झरी तालुका अध्यक्ष संजयजी जंबे यांनी केले.
कार्यक्रमाचा यशस्वेते करीता जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे, सूर्यकांत खाडे, विजय नगराळे, धिरज कुचनकार, हेमंत गावंडे,मनोज वाकटी, राजु उपरकार, रामकृष्ण वैद्य, आशुतोष नागरिक, सचीन चव्हाण, प्रंशात सलाम, प्रणय बल्की, अखिलेश जयस्वाल यांनी प्रचंड मेहनत घेतली.

अवैध मुरुमाच्या वाहनाला महिला तलाठी रोशनी काेल्हेंनी घेतले दंडात्मक कारवाईसाठी ताब्यात !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 

चंद्रपूर : काेरपना भागात अवैध गाैण खनिज वाहनांवर कारवाई करण्याची माेहीम जाेरात सुरु असुन आज बुधवार दि.२३ फेब्रुवारीला सोनूर्ली वनसडी येथे दुपारी अंदाजे 12.48 वाजता 100 घन फूट मुरुम भरून अवैधरित्या वाहतूक करताना एका वाहनाला महिला तलाठी रोशनी काेल्हे यांनी पकडले. चाैकशी अंती सदरहु वाहन चालकाजवळ कोणतीही जावक पावती नव्हती किंवा परवाना आढळून आला नाही.
   
या वाहनांवर गाडी क्रमांक नमूद नसुन उपराेक्त
 ट्रॅक्टर हे सतीश मधुकर झाडे,रा. येरगव्हान, यांचे मालकीचे आहे. या वाहनाचा चालक कृष्णा संबु मेश्राम, रा. हातलोनी असून ते वाहन भाडेतत्वावर हर्षवर्धन जुल्म्हे यांचे कडे असल्याचे कळते.
जप्तीतील वाहन वनसडीच्या तलाठी राेशनी कोल्हे यांनी ताब्यात घेतले असुन या वाहनाचा पंचनामा काेरपनाचे मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांनी करुन ते ट्रॅक्टर, तहसील कार्यालयात जमा केले आहे.
तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांचे मार्गदर्शना खाली सदरहु कारवाई करण्यांत आली असुन तलाठी रोशनी काेल्हे यांना सदरहु वाहन ताब्यात घेतांना पटवारी प्रकाश कमलवार व काेरपना तहसीलचे वाहन चालक सुरेश नागोसे यांनी माेलाचे सहकार्य केले.

या आधी मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे तलाठी विरेन्द्र मडावी, अमाेल गाेसाई व महसुल पथकांनी याच भागात अवैध गाैण खनिज प्रकरणात माेठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहे. 

चंद्रपूर नागपूर हायवेवर कार, ट्रॅक व ट्रॅव्हल्सचा एक्सीडेन्ट


सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 

वरोरा : आज चंद्रपूर नागपूर महामार्गांवर भीषण अपघात झाला. यात कार पलटी झाली असून ट्रॅव्हल्स आणि ट्रॅक एकमेकांना भीडले असल्याचे वृत्त आहे. ही घटना खांबाडा जवळ घडली.

वृत्त अस की, चंद्रपूरहुन नागपूर कडे जाणारी कार अचानक वन वे क्रॉस करीत असतांना ट्रॅक व ट्रॅव्हल्स (DNR) नागपूरहुन चंद्रपूर ला येत असतांना अचानक कार वन वे करीत असता, कार ला वाचविण्याच्या चक्कर मध्ये ट्रॅक आणि ट्रॅव्हल्स ची धडक झाली.

यात कार मध्ये बसलेल्या इसमाना किरकोळ जखमा झाल्या. तूर्तास अपघातात तीन जन जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

संप वार्ता : वणीत दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रीय, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार दोन दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संपाची सुरुवात लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे झाली आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रमुख प्रश्नासाठी गेल्या तीन वर्षापासून सतत पाठपुरावा करूनही निकाली न लागल्यामुळे नाईलाजाने लाक्षणिक संपाचे हत्यार संघटनेला हाती घ्यावे लागले. या संदर्भाने ठाणेदार पोलीस स्टेशन, उपविभागीय अधिकारी तहसिल कार्यालय, वणी तसेच वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजीव रेड्डी बोडकुरवार यांना मागण्यासंदर्भाचे निवेदन देण्यात आले आणि संपाला सुरुवात झाली.

अशी माहिती अध्यक्ष श्री राजू आगलावे, सचिव आनंद नगराळे, अरविंद ब्राह्मणे, राहुल करमरकर, मनोज भाऊ सरमोकदम, अनिल चामाटे, जयंत त्रिवेदी, सुरेंद्र समर्थ, मनोज केळकर व अशोक भाऊ बागळदे इत्यादींनी दिली.