पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील पश्चिमेस असलेल्या बोटोणी जंगल भागात पट्टेदार वाघ काल सोमवार ला सकाळी मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेची विविधांगी चर्चा तालुकाभर ऐकिवात होती.

बोटोणी हा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. या जंगल क्षेत्रात अधून मधून वाघाचा सह अन्य प्राण्यांचा वावर असतो. हा मृतक पट्टेदार वाघ “परिसरात ट्रॅप कॅमेरात तो कैद झाला. असं एका वृत्त वाहिनीत म्हटलं गेलं. या वाघाच्या मानेलगत जखम असल्याची माहिती वनविभाग सूत्रांकडून मिळाली वैगेरे वैगेरे...
मात्र, वाघाला जखम कशाने झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नसली तर वन्य प्राण्यात संघर्ष वैगेरे झाला का? असा सहजच प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे वाघाची जखम वाढत जावून त्यात जंतू पडले असावेत व नाल्याच्या पाण्यातून निघणे अवघड झाले असावे. त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा वाघ मृतावस्थेत चिंचोणी मारोती मंदिरा जवळ (जुने रिठ) असलेल्या नाल्या शेजारी वन विभागाच्या चौकीदारास निदर्शनास आला असे समजते. 
घटनास्थळी दुर्गंधी पसरली होती. वनविभागाने तत्काळ पावले उचलत मृत वाघाचा पंचनामा केला आहे. दरम्यान या अगोदर अन्य प्राणी व वाघांमध्ये भीषण झुंज झाली असावी का? याच झुंजीत या वाघांचा मृत्यू झाला असावा! असा प्राथमिक अंदाज चर्चेतून लावण्यात येत आहे.मात्र, नेमकं खरे काय हे तपास अहवालातून समोर येइलच.