सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्री रवीना टंडन आज सोमवारी वणी येथे आली होती. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ 'ती' रोड शो मध्ये सहभागी होऊन मतदारांना विकासासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
यावेळी वणी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, संजय पिंपळशेडे, यासह महायुतीचे व मित्र पक्षातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी सामील झाले होते. विशेष म्हणजे महिलां पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली.
प्रत्यक्ष मतदानासाठी केवळ चार दिवस आहे. यासाठी उमेदवार मतदारांना जागृत करण्यासाठी स्टार प्रचार असो की पक्षाचे वरिष्ठ नेते मंडळी असो, उमेदवारांच्या प्रचारासाठी रात्रंदिवस एक करित आहे. यात भारतीय जनता पक्ष सर्वात पुढे असताना दिसत आहे. यासाठी विदर्भात सिनेकलाकार स्वयं्फुर्तीने प्रचारात उतरले असून आज वणी येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ सुप्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ह्यांचा रोड शो आयोजित करण्यात आले होते. येथील शिवतीर्थावरून प्रचाराला सुरुवात झाली त्यानंतर वणी शहरातील प्रमुख मार्गाने जयघोष करित परत टिळक चौक येथे रोड शो ची सांगता करण्यात आली. या रोड शो प्रचारादरम्यान विशाल विजयी संकल्प करण्यात आले असून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आपण येत्या 19 एप्रिल ला आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन सुधीर भाऊंना मतदान करावे आणि निवडून लोकसभेत पाठवावे,असे आवाहन आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केले.
दरम्यान अभिनेत्री रवीना टंडनला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जन समुदाय रस्त्यावर उतरला. तूर्तास जनतेमध्ये उत्सहाचे वातावरण यावेळी दिसून आले.