यवतमाळ सत्ता | प्रतिनिधी
मारेगाव : आज जमाना जरी मोबाईल, डिजिटल चा असला तरी खेळाडूनी खेळ खेळला पाहिजे, खेळाने व्यायाम होतो असे, प्रतिपादन कृ.उ. बा.समिती चे संचालक अविनाश लांबट यांनी केले, ते श्री संत गदाजी महाराज, बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने भरविण्यात आलेल्या सामन्यात अंतिम विजयी संघाला प्रोत्साहित करित आपल्या भाषणात बोलत होते.
उदघाटक सरपंच अरविंद ठाकरे (कुंभा), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रवीण नान्हे (सरपंच बोरी), प्रमुख पाहुणे भाजपचे तालुका अध्यक्ष तथा संचालक अविनाश लांबट, पारस गंधर्व ब्रिक्स चे संचालक प्रवीणभाऊ बोथले, तसेच विशेष उपस्थिती सुरेशदादा लांडे (देवाळा उपसरपंच), उपसरपंच प्रदीप साबरे, सुनील पिंपळकर यांची उपस्थिती होती.
दि.11 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत क्रिकेट चे सामने खेळीमेळीच्या वातावरणात चालले होते. जिल्ह्याभरातून या सामन्यात संघांनी सहभाग घेतला होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, पहिल्यांदाच बोरी क्रिकेट क्लब च्या वतीने उत्कृष्ट नियोजन करून सामान्यांचे आयोजन केले आणि खेळाडूंना एक प्रकारचे माध्यम उभारून जे कार्य केले आहे, हे असेच पुढेही चालू राहोत त्यासाठी आमचे सहकार्य आपल्या मंडळाकरिता असणार आहे असेही ते म्हणाले. तसेच या प्रसंगी इतर मान्यवारांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त करून विजयी संघांचे कौतुक करित अभिनंदन केले.
तब्बल एकोणीस दिवस चाललेल्या सामन्यात प्रथम बक्षीस वडकी येथील संघांनी पटकावला, द्वितीय बक्षीस गोंडबुरांडा संघांनी तर, तृतीय बक्षीस रामनगर संघांनी मिळवले. चौथे बक्षीस बोरी (गदाजी) संघांनी ठेवले. विजयी संघांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी श्री संत गदाजी महाराज क्रिकेट क्लब बोरी चे अध्यक्ष राहुल खंडाळकर, उपाध्यक्ष गणेश नान्हे, सचिव नितेश खंडाळकर, सह सचिव प्रतिक राऊत, कोषाध्यक्ष सुमिन दास, क्रिडा प्रमुख प्रवीण बाबरे, या सर्व मंडळाच्या तसेच गावातील युवा वर्ग व नागरिकांच्या उपस्थितीत तब्ब्ल 19 दिवस चाललेल्या सामन्याचे शनिवार दि.24 फेब्रुवारी ला सायंकाळपर्यंत अंतिम सामना वडकी आणि गोंडबुरांडा यांच्या पार पडला असून वडकी संघाने प्रथम बक्षीस मिळवले.
दरम्यान,सर्व संघांचे मंडळाच्या वतीने कौतुक तथा आभार मानण्यात आले. या सामन्यात उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपल्या कलागुणांना उजाळा देत खेळाडूंच्या समवेत चौकार, षटकार मारून क्रिकेट चा आनंद लुटला, यावेळी प्रेक्षक तसेच गावातील युवा मंडळीं बघण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होती.