तालुका महामंत्री प्रशांत नांदे यांना पितृशोक

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : प्रभाग क्र.७ मारेगाव येथील अजाबराव नांदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी मध्यरात्री २ वाजता निधन झाले. त्यांच्यावर मारेगाव स्मशानभूमीत शुक्रवारी (ता. ५) सकाळी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. येथील धोबी परीट महासंघांचे मारेगाव तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका महामंत्री श्री. प्रशांत नांदे यांचे ते वडील होत.