सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : शहरात सध्या भरधाव रेसिंग फॅडने मारेगावकरांची झोप उडवली आहे. शहरातील रस्ते मोकळे असो की, गजबजलेले असो. स्टंटबाजी करत भरधाव रेसिंग करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे हे वेळीच थांबवा अशी मागणी केली जात आहे.
मारेगावात दिवसेंदिवस रेसर बाईक ची संख्या वाढत चालली असुन, सदर रेसर बाईक चालकाकडे कोणत्याही प्रकारचे ड्रायव्हींग लायसन्स नसुन विनाकारण सुसाट बाईक चालवुन हौदोस निर्माण करीत आहे. परिणामी भरधाव बाईक चालवतांना समोर कोणतीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भात काही रेसर बाईक चालकांना संघटनेकडुन जॉब विचारणा केली असता, त्यांना कोणत्याही प्रकारची उत्तरे मिळाली नाही. उलट निमूटपणे बाईक धारक 'धूम' ढोकत निघून जातात. हे सर्व प्रकार मारेगांव शहरात ट्राफीक पोलीस नसल्याकारणाने या रेसर बाईक धूम ढोकणाऱ्याना कसल्याही प्रकारची भिती नसल्याची निवेदनात नमूद आहे.
ज्यामुळे मारेगावकरांना त्रास होतोच आहे. मात्र, या स्टंटबाज आणि भरदिवसा रेसिंगने पादचारी यांच्याही नाकात दम केला. अनेक वेळा याबाबत माध्यमातून वृत्त प्रकाशित करून देखील हे स्टंटबाज आणि भरधाव रेसिंग सुरूच आहेत. आता त्यांच्या मुळावरच घाल घाला व त्यांचा हैदोस आवरा यासाठी जय जगन्नाथ चालक मालक संघटनेच्या वतीने पोलिसात एक निवेदन देऊन मागणी केली आहे.
निवेदन देताना सचिन देवाळकर, साजीद शेख, किशोर तूरणकर, बन्सी पाटील, बबन पाटील, दत्ता डावरे, प्रफुल उरकुडे, पंकज एम्बडवार, प्रल्हाद कनाके, पवन नक्षणे आदींची उपस्थिती होती.