सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 वाजता सौ रत्नमाला शंकरराव मडावी यांचे दुःखद निधन झाले, त्या से.नि.नायबतहसीलदार, विद्यमान नगरसेवक तथा तालुका काँग्रेस सरचिटणीस श्री. शंकरराव मडावी यांच्या पत्नी. तर समाजकल्याण उपायुक्त डॉ. सचिन मडावी (गडचिरोली) यांच्या त्या मातोश्री होत्या.
गेल्या अनेक महिन्यापासून त्यांचेवर उपचार सुरु होते. मात्र दीर्घ आजाराने आज पहाटे गडचिरोली येथील हॉस्पिटल मध्ये त्यांचे निधन झाले. सर्वपक्षीय नेते तसेच शेकडो जनसमुदायाच्या साक्षीने मारेगाव येथील स्मशानभूमीत संध्याकाळी 4 वाजता त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. काँग्रेसचे जेष्ठ नेते नरेंद्र पा.ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेऊन अनेकांनी शब्दसुमनांजली अर्पित करून श्रद्धांजली वाहिली.
त्यांचा पश्चात पती, मुलगा, मुलगी, स्नुषा, जावई व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.