सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यावर्षी १३२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती दिनानिमित्त आज सायंकाळी सात वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
याप्रसंगी चंद्राभाऊ ठाकरे यांनी बाबासाहेबाच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला. धम्मराजिका बुद्ध विहारातील प्रांगणात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण तात्याजी चिकाटे, मनोहर भेले यांनी केले. बुद्ध रुपाला अनुयायी यांनी पुष्पमाला अर्पण करीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत निळ्या पताका लावीत बाईक रॅलीने शहराच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.