सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : येथील स्थानिक श्री जैताई देवस्थानामध्ये चैत्र नवरात्र उत्सव सुरू आहे. त्या अंतर्गत रोज रात्री विविध कार्यक्रम होत आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवारी ‘गीत रामायण’ या शीर्षकाखाली एक कार्यक्रम झाला.
संस्कार भारती समिती शाखा वणी व नूपुर नृत्य निकेतन अकादमी तर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यात गुरु नृत्यांगना सूचना बंगाले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी गीत रामायण आणि विविध भक्ती गीतांवर शास्त्रीय नर्त्याद्वारे हा कार्यक्रम प्रस्तुत केला. वणीकर श्रोते कार्यक्रम पाहून दंग झाले असून आयोजकांचे विशेष कौतुक केले.
यात त्यांनी विविध गीतांवर कथ्थक हे शास्त्रीय नृत्य सादर केले. सतीश बगडे यांनी गणेश वंदना आणि जय जय नंदकिशोर हरे या नृत्यासह कार्यक्रमाचा आरंभ केला. त्यानंतर साक्षी गायधने यांनी सरस्वती स्तुती आणि आईगिरी नंदिनी ही नृत्य प्रस्तुत केलीत. गुरु सूचना बंगाले यांनी ठुमक चलत रामचंद्र, विठू माऊली, भजे वसंतम आदी नृत्य सादर केलीत.
सतीश आणि साक्षी यांनी हम कथा सुनाते है, हनुमान चालिसा आणि अबीर गुलाल ही नृत्य प्रस्तुत केलीत. माही सांबारे यांनी धन्य धन्य प्रदक्षिणा प्रस्तुत केलं. त्यानंतर पल पल हे भारी हे समूह नृत्य झालं. सुनिता डाबरे, निखिल वाघाडे, जयती सुराणा, स्पृहा कोरडे, आरोही खैरे यांनी रामचंद्र कृपाळू ही नृत्य प्रस्तुत केलीत.
यावेळी माधव सरपटवार अशोक सोनटक्के यांनी सूचना बंगाली तथा कलावंतांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला तसेच राजू उंबरकर यांचा मनसेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचा संचालन अभय पारखे यांनी केलं मैफिलीचे निवेदन सूचना बंगाली यांनी केले असून, तांत्रिक बाजू सागर मुने यांनी सांभाळली, चंद्रकांत अणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या मैफिलीचा लाभ शहरातील सर्व रसिक श्रोत्यांनी आणि भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.