सह्याद्री चौफेर | वृतसंस्था
मारेगाव : तालुक्यातील वनोजा देवी येथील परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय गेल्या काही वर्षापासून जोमात सुरु आहे. यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूच्या व्यसनामुळे पारिवारिक कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गांवर आहेत. विदर्भातील प्रसिद्ध मंदीर जानामाय कासामाय याच देवीच्या परिसरात व गावात सुरु असलेली अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी 20 ते 25 महिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धडक देत अवैध दारूविक्री व विक्रेत्यावर कडक कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली.
ग्रामपंचायत हद्दीत वनोजा गावासह देवीच्या परिसरात अवैध दारू विक्री खुलेआम सुरु आहे. यामुळे गावासह परिसरातील वातावरण कलूषित होत झाले असून, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेवून वनोजा देवी येथील दारूविक्री कायमची बंद झाली पाहिजे याबाबतचा ग्रामपंचायतचा ठराव घेवून असंख्य महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदनासह ठराव आज 24 मार्च रोजी मारेगाव येथील ठाणेदार पुरी व तहसीलदार पुंडे यांना देण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सरपंच डीमन टोंगे व उपसरपंच प्रशांत भंडारी यांचे नेतृत्वात वनिता ढोके, सुषमा ढोके, अमृता ढोके, सिंधू सोनटक्के, चंद्रकला राजूरकर, सीमा शिंदे, प्रियांका बोढे, इंदिरा बरडे, विमल सातपुते, जोत्स्ना आस्वले, गिरजा राजूरकर, कुंता मोतेकर, परवीन शेख, मनीषा राजूरकर, सुनंदा राजूरकर, प्रशांत बोढे, गोवर्धन टोंगे, आदींच्या उपस्थितीत देण्यात आले. सदर तक्रारीची तात्काळ दखल घेवून दारुविक्री कायमस्वरूपी बंद न केल्यास यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात न्याय मागण्यात येईल.
खरंतर मी 23 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना मारेगाव येथील दौऱ्यावर असतांना याबाबत एक लेखी देऊन वनोजा देवी या परिसरातील अवैध दारू विक्री होत असल्याचे निवेदन दिले होते, मला साहेबांनी मौखिक आश्वासन देऊन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा हा दारूबंदी चा विषय आज सर्व ग्रामस्थाना समोर मांडून आमसभेत मांडला त्यावर सर्वांनी सकारात्मक होकार देत तसा ठराव पारित करून तो ठराव मंजूर करून मारेगाव पोलीस स्टेशनला आज शुक्रवारला दिला आहे. पोलीस प्रशासन या अवैध दारू विक्री बंद करतात की, नाही हे पाहणं आता गरजेचे आहे.-प्रशांत भंडारीउपसरपंच, वनोजा ग्रामपंचायत पं स मारेगाव