मारेगाव मैत्री कट्टा द्वारा याही वर्षी महिलांकरिता भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम
सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : शहरातील "मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप" च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतीक महिला दिनानिमित्य दि.11 व 12 मार्च 2023 ला शनिवार व रविवार रोजी येथील महिलांसाठी भरगच्च विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकेकाळी मारेगाव येथे बरीच सांस्कृतिक चळवळ चालायची. कालांतराने येथील जुने मित्र,मैत्रिणी हे कुटुंब,व्यवसाय, कामानिमित्त बाहेरगावी गेले. पुन्हा एकदा याच मारेगावच्या सुपुत्रांनी नव्या जोमाने सांस्कृतिक चळवळ चालविण्याचा निर्धार केला आणि याचाच एक भाग म्हणून हे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दुपारी ३ वाजता डॉ.बाबा साहेब आंबेडकर चौक येथून भव्य महिला सांस्कृतिक रॅली निघणार आहे .यात महिलांचे भांगडा नु्त्य,आदिवासी नृत्य,लेझिम पथक, कराटे पथक राहणार आहे. विषेश म्हणजे मारेगावं चे खास आकर्षण असणारे हिरकणी ढोल ताशा पथक यात सामील होणार आहे. हे पथक खास दोन महिन्यापासून अहोरात्र सराव करीत आहे, हे विशेष उल्लेखीय.
ही आकर्षक रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पटवारी चौक, नगर पंचायत, संभाजी चौक, ते बसस्थानक असा मार्गक्रमण करीत जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी 12 मार्च ला सायंकाळी 4 वाजता शेतकरी सुविधा केंद्र, मारेगाव येथे सामूहिक महिला नृत्य स्पर्धा होणार असून यात प्रथम पारितोषिक ११०००
द्वितीय पारितोषीक 7000 तृतीय पारितोषिक
5000 राहणार आहे.त्याची प्रवेश फी रु ५०० ठेवण्यात आली आहे.तसेच महिलांची एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात प्रथम पारितोषिक 7000
द्वितीय पारितोषीक ५००० तृतीय पारितोषिक
3000 राहणार आहे. यासाठी प्रवेश फी 200 रूपये ठेवण्यात आली आहे.
विजेत्यांना प्रोत्साहन पर बक्षिसे...
नृत्य स्पर्धा करिता प्रवेशासाठी संपर्क करा सौ. प्रतिभाताई डाखरे ९९२२६६९६४८, सौ. मालाताई बोढे ९७६६१३०१८६, सौ. मयूरीताई जैस्वाल ७०६६००६६८४,
यांचेशी संपर्क साधण्याचे व रॅली मध्ये सर्व महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन मारेगाव मैत्री कट्टा ग्रुप च्या वतीने दिपक जुनेजा, सौ.बिना दुपारे हेपट, उदय रायपुरे, खालिद पटेल, गजानन जयस्वाल, किशोर पाटील, इत्यादीनी केले आहे.