सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : अल्पवयीन गर्भवती पीडितेला माहेरी पाठवून आरोपी पसार झाला. माहेरच्यांनी त्याचा शोध घेतला परंतु त्याचा कुठेही थांग पत्ता न लागल्याने अखेर पोलिसात गुन्हा तक्रार करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला व प्रकरण तपासात घेतले आहे.
दि.18 जुलै 2022 रोजी त्याच्याशी लग्न करून मारेगाव तालुक्यातील करणाडी येथे तात्पुरता झोपडी मध्ये वास्तव्य करून राहत असलेला आरोपी बळजबरी करून पीडित गर्भवती राहिली. पीडितेला माहेरी पाठवून मी बाहेरगावी कामाला जाते असे सांगून तो कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेला आहे.
परिसरात कुटुंबातील सदस्यांनी शोध घेतला परंतु कुठेही आढळून आला नाही. सदर संशयित आरोपीचे नाव अंकुश अमरसिंग राऊत असे असून तो सालेभट्टी ता भिवापूर जि नागपूर येथील आहे.