सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : नरसाळा येथे २३ नोव्हेंबर रोजी आदिवासी गोवारी शहीद स्मृती दिनी येथील सर्व समाज बांधवांनी शहीदाना श्रद्धांजली वाहून नमन करण्यात आले.
नागपूर येथील हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात २३ नोव्हेंबर १९९४ ला गोवारी समाजाच्या मोर्च्यात झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ गोवारी बांधव शहीद झाले होते. त्यानंतर झिरो माईल चौकात गोवारी स्मारक उभारण्यात आले. मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी २८ वा गोवारी शहीद स्मृती दिवस श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील स्मृती स्मारकाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास नेहारे यांनी गोवारी समाजाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला तर आदिवासी समाजाच्या वतीने कैलास उईके व संजय केराम यांनी पुष्पहार अर्पण केला. कोलाम समाजाच्या वतीने ज्ञानेश्वर दडांजे यांनी हार अर्पण करून शाहिदांना श्रद्धांजली वाहून नमन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी ११४ शहीदाना श्रद्धांजली वाहण्यात आली. या शहीद स्मृतिदिन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हरिदास नेहारे होते, तर प्रमुख पाहुणे येथील सरपंच संगीत मरस्कोल्हे, पेसा कोस समितीचे अध्यक्ष उज्वला मडावी, किशोर सुरपाम विरंगना राणी दुर्गावती मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शन मारोती कोहळे यांनी केले. तर आदिवासी गोवारी समाजाला मोलाचे मार्गदर्शन ह. भ. पारायण, किर्तनकार मारोती खंडरे महाराज यांनी केले. या कार्यक्रमाला येथील देविदास नेहारे, रामकृष्ण नेहारे, दिपक नेहारे, गजानन नेहारे, देविदास कारसरपे, सुधाकर कारसरपे, वसंता खंडरे, रामकृष्ण खंडरे, नामदेव खंडरे, रामकृष्ण कोहळे, रुपेश दडांजे, विवेक तोडसे, धनंजय तोडसे, वर्षा सुरपाम, प्रतिभा सोयाम, बेबी तोडसे, कौशल्या कोरझरे, व मोठया संख्येने आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.