सह्याद्री चौफेर | न्यूज
मारेगाव : वसंत जिनिंगच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आणि उभे ठाकलेल्या पॅनलची रंगत वाढायला लागली असून परिवर्तन पॅनलला मतदारांचा वाढता कौल पाहता इतर पॅनलचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फीच होते की, काय असे वाटायला लागले आहे.
वणी विधानसभा मतदार संघातील सर्वात महत्वाची आणि राजकीय दृष्टया फायदेमंद असलेल्या वसंत जिनिंगची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. या निवडणुकीत एकूण चार पॅनल एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहे. यात काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनल, सध्यास्थितीत सत्तारुढ असलेले अॅड. देविदास काळे गटाचे जय सहकार पॅनल, भाजप समर्थित शेतकरी एकता परिवर्तन पॅनल तर कम्युनिस्ट आणि शेतकरी संघटना समर्थित वसंत जिनींग बचाव पॅनल असे चार पॅनल मध्ये चौरंगी लढत आहे. यातील काँग्रेसचे असलेले परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांचा 'डोअर टू डोअर' जाऊन प्रचार सुरु आहे. मा. आमदार कासावार यांच्या योग्य नियोजनाचा यावेळी या पॅनलला फायदा होतांना दिसत आहे.
विशेष उल्लेखनीय की, ग्रामीण भागामध्ये काँग्रेसची पाळेमुळे रुजून असल्यामुळे आणि मागील काही निवडणुकीतील कटू अनुभव पाहता यावेळी एकदिलाने काम करतांना दिसत आहे. काँग्रेसमध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने जरी दोन गट पडले असले तरी मोठया प्रमाणात नेते परिवर्तन पॅनल सोबत असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातही काँग्रेस कार्यकर्ते एकदिलाने परिवर्तन पॅनल सोबत एकजुटीने फिरतांना दिसून येत असून कार्यकर्त्यांच्या भरोशावरच ही निवडणूक जिंकण्याचा आशावाद काँग्रेस नेते माजी आमदार वामनराव कासावार यांनी व्यक्त केला.