रवी घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : सतत आत्महत्येच्या धगेने मारेगाव तालुका हदरून सोडला असतांना ग्रामीण भागासह आता मारेगाव शहरातही आत्महत्त्येची मालिका सुरु असल्याचे चित्र दिसून येते. म्हैसदोडका, नरसाळा, केगांव यानंतर आता मारेगाव शहरात प्रभाग क्र 13 मध्ये एका 23 वर्षीय अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या युवकाने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडीस आली.
गौरव सुदेश मोरे (23) रा. घोडदरा असे गळाफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, ही घटना आज दि.8 ऑक्टोबर ला सकाळी उघडीस आली. गौरव हा वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे अभियांत्रिकी च्या अंतिम वर्षाला होता. नुकतेच त्याने अंतिम वर्षाची परीक्षा देऊन मूळ गावी घोडदरा (ता. मारेगाव) येथे आला होता. मारेगाव तालुका शिवसेनेचे उपतालुका प्रमुख तथा शिवभोजन चे संचालक राजू मोरे यांचा गौरव हा पुतण्या होता.दरम्यान , दसरा मेळावा करिता काका हे मुंबई येथे गेले होते.या दरम्यान शिवभोजन केंद्र सांभाळण्याची जबाबदारी गौरव याचेवर देण्यात आली.गेल्या चार दिवसांपासून ही जबाबदारी सांभाळत असतांना काका राजू मोरे हे शुक्रवारच्या रात्री मारेगावात दाखल झाले.
दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मारेगाव येथे गौरव हा सवंगड्या सोबत थिरकला. रात्री घरातील व मित्रांनी अनेकदा त्याला मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने कुणालाच प्रतिसाद दिला नाही.परिणामी आज सकाळी मारेगाव येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाड्याने राहत असलेल्या काका राजू मोरे हे घराच्या छतावर गेले असता जिना वरील टिनाच्या शेड असलेल्या लोखंडी अँगल ला ओढणीने गळफास घेऊन गौरव हा मृतावस्थेत निदर्शनास आला.
मृतकाच्या पाठीमागे आई, वडील व धाकटा भाऊ आहे.